GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जीएसपीएम परिवारातर्फे लातूर जिल्ह्यातील १० शिक्षकांचा गुरुवर्य पुरस्कार देऊन सन्मान सोहळा

जीएसपीएम परिवारातर्फे लातूर  जिल्ह्यातील १० शिक्षकांचा गुरुवर्य पुरस्कार देऊन सन्मान सोहळा 

उदगीर : येथील जीएसपीएम परिवार  उदगीरच्या वतीने लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या 10  शिक्षकांचा गुरुवर्य  पुरस्कार देऊन दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी सत्कार करण्यात आला. गुरुवर्य पुरस्कार सोहळा २०२२ या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एस पी एम संस्थेचे  अध्यक्ष  बापूसाहेब राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  अविनाश देवंशटवार, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण  लातूर , माजी आ. शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष जे एस पी एम लातूर ,  डॉ . दत्तात्रय पवार, वैद्यकीय अधीक्षक उदगीर ,   राहुल केंद्रे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर ,  शिवानंद हैबतपुरे प्रदेश प्रवक्ते भा ज पा हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरच्या हस्ते करून करण्यात आली. 
गुरुवर्य पुरस्कार सोहळा 2022 मध्ये जिल्ह्यातील 240 विविध  शैक्षणीक संस्थेतील प्राप्त नामांकनातून 10 सर्वोत्कृष्ट शिक्षकांची निवड गुरुवर्य पुरस्कार  सोहळ्याच्या निवड समितीने केली होती. त्यामध्ये प्रा. प्रताप हनुमंतराव भोसले , चन्नबसवेश्वर पॉलिटेक्निक कॉलेज लातूर , श्री चिद्रेवार संजय बाबुराव, श्री अनंतपाळ नूतन विद्यालय शिरुर अनंतपाळ, प्रा. बस्वराज काशिनाथ सुगावे, चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज लातूर, प्रा. डॉ.  नरसिंग आप्पासाहेब कदम, शिवाजी महाविद्यालय उदगीर , प्रा. डॉ. जयद्रथ सुभाषराव जाधव, शिवाजी महाविद्यालय रेनापुर, श्री मोठेराव चंद्रकांत श्रीरंगराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंद नगर ता.देवणी,  सौ चिट्टे संगीता गंगाधर, जिल्हा परिषद केंद्रीय  प्राथमिक शाळा घोणशी ता. जळकोट, श्री पटेल जहांगीर हाफिजखा, पोस्ते पोद्दार लर्न स्कूल उदगीर, श्री शेख इस्माईल शामोहम्मद, क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर, प्रा.डॉ. सौ.बावगे श्यामलीला भीमाशंकर लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव तालुका औसा या 10 सर्वोत्कृष्ट शिक्षकांना सहपरिवार उपस्थित मान्यवराच्या हस्ते  गुरुवर्य पुरस्कार सोहळ्याचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तुळशीचे रोप, शाल व मानाची पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अमित  राठोड यांनी केले, सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत उपस्थिताथासमोर मांनले. अविनाश देवसटवार , शिवाजीराव पाटील कव्हेकर  यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब राठोड  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. वर्षा बिरादार  यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ . योगिता चितोडे  यांनी मानले. या कार्यक्रमास  जीएसपीएम परिवारातील शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा उदगीर, राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीर, एस आर इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी उदगीर , राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीर व बिर्ला ओपन इंटरनॅशनल स्कूल उदगीर चे प्राचार्य प्राध्यापक विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तसेच उदगीर शहरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षक ही उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments