GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय : माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय  : माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येत्या काळात रस्त्यावर उतरणार

उदगीर : येथील बाजार समितीच्या विद्यमान संचालकांकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील बाजार समित्यांपेक्षाही उल्लेखनीय आहे. या बाजार समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निश्चितच याचा  फायदा होणार आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी  केले.

उदगीर बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शुभ कार्यासाठी लागणारे मंगल कार्यालय व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे होते. यावेळी कल्याण पाटील, चंद्रकांत वैजापुरे, उपसभापती रामराव बिरादार, सहायक
उपनिबंधक बाळासाहेब नांदापूरकर, चंद्रप्रकाश खटके, सचिव भगवानराव पाटील, सरपंच उदय मुंडकर, संचालक सुभाष धनुरे, मोहन गडीकर, कुमार पाटील, संतोष बिरादार, संजय पवार, अॅड. पद्माकर उगिले, गौतम पिंपरे, युवकचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे,  यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. बनसोडे यांनी उदगीर बाजार समितीने बालिका बचाव, शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी शिबिर, गावोगावी जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद, नैसर्गिक आपत्तीने पशुधन दगावल्यास आर्थिक मदत, बनीम जळाल्यास मदत असे उपक्रम राबविले आहेत. आता मंगल कार्यालयाची इमारत उभी राहत आहे. ती नाममात्र दरात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम मराठवाड्याबरोबरच राज्यातील बाजार समित्यांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती सिध्देश्वर पाटील यांनी तर सुत्रसंचलन नंदकुमार पटणे यांनी केले.

चौकट

मतदारसंघातील शेतकरी विना नुकसानभरपाई, अतिवृष्टीमधून मिळणाऱ्या मदतीत राज्य सरकार दुजाभाव करीत असेल तर रस्त्यावर लढाई करण्यास मी तयार आहे. मागील अडीच वर्षे मी सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो. आता विरोधी पक्षाचा आमदार या नात्याने जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असेही माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे मनोगतात व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments