GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी उदगीरात रक्तदान शिबिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी उदगीरात रक्तदान शिबिर 

सेवा पंधरवड्यात विविध उपक्रम : शहराध्यक्ष मनोज पुदाले



उदगीर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहर भाजपाच्या व भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरम्यान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शहरातील उदागिर बाबांच्या समाधीसह अनेक धार्मिक स्थळी अभिषेक करून पंतप्रधान मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
    यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, भाजयुमोचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, वसंत शिरसे, दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, अमोल अनकल्ले, सावन पस्तापुरे,  श्यामला कारामुंगे, बबिता पांढरे, मंदाकिनी जीवने, जया काबरा, सुमित बागबंदे, अमर सूर्यवंशी, व्यंकट काकरे, संजय पाटील,  आनंद बुंदे, आंनद साबणे, झेरिकुंटे, राजकुमार मुळे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरावडा राबविण्यात येत असून या काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील अनेक डॉक्टरांनी शनिवारी गरजू रुग्णांना माफक दरात रुग्णसेवा पुरविली असल्याचे ही मनोज पुदाले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments