GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

हैदराबाद-पुणे रेल्वे नियमित करा आ. संजय बनसोडे यांचे रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्याचे निवेदन सादर

हैदराबाद-पुणे रेल्वे नियमित करा आ. संजय बनसोडे यांचे रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्याचे निवेदन सादर

उदगीर : हैदराबाद ते पुणे व्हाया बिदर, उदगीर लातूर मार्गे जाणारी त्रैसाप्ताहिक रेल्वे नियमित करावी तर बिदर मुंबई ही नवीन नियमित रेल्वे सुरू करावी या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे दिले आहे.
आ. संजय बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत बिदर ते मुंबई जाण्यासाठी सध्या चालू असलेल्या रेल्वेगाडीचे डबे वाढवून बेडरोलची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. शिवाय बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू करावी, हैदराबाद पुणे रेल्वे संख्या 17013/17014 ही त्रैसाप्ताहिक रेल्वे नियमित करावी, निजामकाळापासून प्रलंबित असलेल्या बोधन ते लातूर रोड या 134 किमीच्या नवीन रेल्वे मार्गाला मान्यता द्यावी अशा विविध मागण्याचे निवेदन दिले.
         दरम्यान रेल्वे मंत्री यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments