GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पिक असून वेळेवर पाऊस पडल्याने सोयाबीनचा पेरा ही वाढलेला आहे. कृषी विभागाच्या जनजागृतीने पारंपारिक पद्धती बरोबरच बीबीएफ तसेच टोकन पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली होती सततच्या  पाऊसामुळे गोगलगायीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 गोगलगाय मुळे तालुक्यात बरेच क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करण्याकरता माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करडखेल ता.उदगीर येथील शेतकरी अरविंद दापके व लोहारा ता.उदगीर येथील शेतकरी  लक्ष्मण पाटील यांच्या खरिप हंगामातील  सोयाबीन शेतीची पाहणी केली. नुकसानग्रस्त क्षेत्राचें तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना  गोगलगायच्या निर्मूलनासाठी करावयाच्या उपाययोजने बाबत व्यापक जनजागृती करावी अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 
दरम्यान आपण शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीर उभे असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.      
    यावेळी  उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, तालुका कृषी अधिकारी उदगीर संजय नाबदे, गटविकास अधिकारी महेश सुळे, मंडळ कृषी अधिकारी एस. आर. पाटील, कृषी पर्यवेक्षक डावळे, कृषी सहाय्यक अमोल पाटील , कृषी सहाय्यक सौ.ससाणे , कृषी विभागाचे कर्मचारी,उपसरपंच  नामदेव मूळे, पोलीस पाटील, एकनाथ कसबे,  प्रकाश हैबतपुरे, अरविंद  दाबके,  शामराव निवृत्ती मुदबे, दिलीप पाटील, शेषराव होळगे , सुरेश निडवंचे, बबन धनबा, वसंतराव पाटील, धनराज पाटील, सोमकांत होळकर, रमेश मोमले, शामराव मुदबे, दिलीप निडवंचे, अरविंद दाबके, गणपत कांबळे, विजयकुमार कांबळे, गणेश कारभारी विष्णू बिरादार, मोहनराव पाटील, अविनाश सुर्यवंशी, सतीश गायकवाड, शुभम भुमणे, आदिसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments