मुंबई : उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा, साताळा, गुरदाळ , खेर्डा या गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने 5 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील शासन निर्णय झाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत या गावात ही योजना राबविण्यात येणार आहे. या गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. या भागातील नागरिकांचा कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याबाबतची अनेक वर्षापासून मागणी होती.
उदगीर तालुक्यातील मौ.धोंडीहिप्परगा या गावासाठी 01 कोटी 99 लाख 53 हजार, मौ.सताळा या गावासाठी 01 कोटी 69 लाख 37 हजार, मौ.गुरदाळ या गावासाठी 71 लाख, मौ. खेरडा या गावासाठी 01 कोटी साथ 07 लाख रुपयाचा निधी जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आला असून याबाबत ची शासन मान्यता झाली आहे. या भागातील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता ही योजना मंजूर झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून याबाबत या भागाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत.
राज्य शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत या योजनेला मान्यता दिली असून हे काम वेळेत व दर्जेदार करून ही योजना त्वरित कार्यान्वित करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या असून लवकरच ही योजना सुरू होईल अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
0 Comments