मातृभूमीत शिवस्वराज्य दिन साजरा
उदगीर : मातृभूमी महाविद्यालयात, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूल व सी-डॉक कॉम्प्युटर्स येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष सतिश उस्तुरे यांनी प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिका अनिता यलमटे यांची उपस्थिती होती. तर यावेळी प्राचार्या उषा कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून ध्वज वंदन केले . प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अनिता यलमटे यांनी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखी शिस्त अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले . नियमाचा भंग करणारे अथवा नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांना महाराज कडक शासन करीत असत . विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्या करिता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेवावा असे सांगितले .
याप्रसंगी उषा कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सामान्य जनते प्रति असलेली न्याय भावना , छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन या बाबत माहिती सांगितली . त्यांच्या कार्याची महती आज जगाने मान्य केली आहे असे सांगितले .
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक ,कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार नंदकुमार बायस यांनी मानले.
0 Comments