GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची सुसंवाद बैठक

संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची सुसंवाद बैठक 


 उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात २२ ते२४ एप्रिल २०२२ कालावधीत होत आहे. त्यानिमित्ताने उदगीर, जळकोट, देवणी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, सचिवांशी सुसंवाद बैठक स्वागताध्यक्ष तथा तथा राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मंचावर कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा.मनोहर पटवारी, संस्थेचे सहसचिव डॉ. श्रीकांत  मध्वरें, कोषाध्यक्ष महादेव नौ बदे,सदस्य प्रा. अडेप्पा अंजुरे ,नाथराव बंडे,डॉ. रामप्रसाद लखोटिया, सिद्धेश्वर पाटील, डॉ. रेखा रेड्डी ,रमेश पाटील चिमेगावकर ,प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर.तांबोळी गटविकास अधिकारी महेश सुळे ,जितेंद्र शिंदे, विजय कुमार चवळे, नायब तहसीलदार संतोष  धाराशिवकर, प्रा. पंडित सूर्यवंशी, डॉ.शाम हिबाने, रोहित मुक्कावार यांची उपस्थिती होती. यावेळी तिरुके म्हणाले संमेलनाच्या प्रचारासाठी ग्रामसभा घेऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यावी. डॉ. रेड्डी म्हणाल्या संमेलनात बचत गटाच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल असावेत ,ग्रंथ दिंडीत आशा वर्कर यांचा सहभाग असावा. नागराळकर म्हणाले संमेलन आपले वाटण्यासाठी सर्वांचे योगदान हवे ,ज्ञानाची परंपरा पुढे नेण्यासाठी महाविद्यालयाने साहित्य संमेलन घेतले आहे. यावेळी अनेक ग्रामपंचायती ,विविध सेवा सोसायट्यांनी देणगीचे धनादेश संयोजकांकडे सुपूर्त केले .समारोपात बनसोडे म्हणाले भौतिक विकासाबरोबर बौद्धिक विकासासाठी संमेलन घेतले. घराघरात साहित्य संमेलनाचा प्रचार करावा हे संमेलन माझे आहे असे समजून प्रत्येक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन प्रा. डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले. आभार साक्षी कस्तुरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments