लोणी प्रिमिअर लीग मध्ये लोणेश्वर स्पोर्टस् क्लब विजयी
उदगीर- तालुक्यातील लोणी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात खेळवला जाणारा लोणी प्रिमिअर लीग यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला .या स्पर्धेमध्ये उदगीर तालुक्यातील एकुण आठ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एकतिस (31,000/-) हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह हे कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री.सिध्देश्वर(मुन्ना)पाटील साहेब यांच्या वतीने देण्यात आले आहे. द्वितीय पारितोषिक ऐकेविस हजार (21,000/-) रुपये रोख व सन्मानचिन्ह हे लोणीचे सरपंच उषाताई यमुनाजी भुजबळे व उपसरपंच वैजनाथभैय्या बिरादार आणि ग्रामपंचायत कार्यालय,लोणी यांच्या वतीने देण्यात आले. तर तृतीय पारितोषिक अकरा हजार(11,000/-) रुपये रोख व सन्मानचिन्ह हे युवा नेते योगेशभैय्या उदगीरकर साहेब यांच्या वतीने देण्यात आले.
या लीग च्या अंतिम फायनल मॅच मध्ये लोणेश्वर स्पोर्टस् क्लब आणि फ्रेन्डशिप क्रिकेट क्लब यांच्या मध्ये अंतिम लढत झाली. या अटीतटीच्या सामन्यात लोणेश्वर स्पोर्टस् क्लब,लोणी विजयी झाले तर फ्रेन्डशिप क्रिकेट क्लब,तोंडार संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.
तर तृतीय क्रमांकावर अंशराजे क्रिकेट क्लब,तिवटग्याळ आहे.
या लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून लोणेश्वर स्पोर्टस् क्लब चा खेळाडू सचिन वाघमारे यांची निवड झाली तर अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून तस्लीम हिटकुले यांनी बाजी मारली. मॅन ऑफ द सिरीज रोख 2100/- रूपये व सन्मानचिन्ह ग्रामपंचायत सदस्य शिवकांत मुळे यांच्या वतीने देण्यात आले तर मॅन ऑफ द मॅच रोख 2100/- रूपये व सन्मानचिन्ह ग्रामपंचायत सदस्य लखन मदनुरे साहेब यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते राहुलभैय्या पाटील मलकापूरकर, सरपंच सतिश पाटील मानकीकर,युवा नेते पवन पाटील, लोणी चे सरपंच प्रतिनिधी यमुनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ बिरादार, ग्रामपंचायत सदस्य शिवकांत मुळे, पांडुरंग केंद्रे, दयानंद पटवारी, परशुराम केंद्रे,गोविंद पाटील,पांडुरंग फड , मिलन पटवारी,गणेश पाटील,अमोल पटवारी,सचिन पाटील, प्रशांत साताळे,गोविंद भुजबळे, व्यंकट फड,बालाजी कांबळे, नितीन वाघमारे इ.मान्यवर उपस्थित होते. या लीगमध्ये संघमालक म्हणून नामदेव पवार, सुभाष राठोड, संतोष कोले, शुभम लोणीकर, फकीर अ.शेख, संतोष कानवटे, निखील वाघमारे इ.संघमालकांनी जबाबदारी पार पाडली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक म्हणून श्रीराम मुळे,महादेव फड, लक्ष्मण भुजबळे, सचिन वाघमारे, बंटी फड,आकाश वाघमारे इ.युवा मित्रांनी आणि समस्त युवा गावकरी मंडळ लोणी यांनी परिश्रम घेतली.
0 Comments