GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

निरोगी व निकोप मन , शरीर स्वास्थ्यसाठी खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक - राज्यमंत्री संजय बनसोडे


निरोगी व निकोप मन , शरीर  स्वास्थ्यसाठी खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक - राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर  : आधुनिक जीवन शौली मुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत शरीर व मन निकोप व निरोगी राहण्यासाठी अशा खेळांची आवश्यकता असते यातून जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळत असतो  असे मत राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील डॉक्टर साठी विविध खेळाच्या  स्पर्धाच्या उदगाटन प्रसंगी व्यक्त केले.

आधुनिक जीवन शैलीमुळे शारिरीक व मानसिक आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील दोन वर्षापासुन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला. कोरोना काळात डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण होता. यामुळे अशा खेळाच्या स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करित असतात
इंडियन मेडिकल कॉन्सिल, लातूर शाखेच्या वतीने लातूर येथील ऑफिसर क्लब येथे डॉक्टर साठी विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. . यावेळी इंडियन मेडिकल कॉन्सिलचे लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ.सुरेखा काळे, सचिव, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ.मोहिनी गणू, डॉ.राजेश्वरी सावंत, डॉ. सुनील होळीकर, डॉ. जैतिन जैस्वाल इत्यादी उपस्थित होते.
दोन वर्षापासुन जागतीक महामारीचा सामना जग करित आहे. या काळात डॉक्टर व आरोग्य यंत्रणेने दिवसरात्र अतिशय उत्कंटक असे कार्य केले आहे. जीवाची पर्वा न करता या मंडळीनी सेवा  केले आहे. डॉक्टर हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असुन यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहे. या काळातील आधुनिक जीवनशैली मुळे अनेक ताणतणावांना या मंडळींना सामोरे जावे लागते. इंडियन मेडिकल कॉन्सिलचे हे अत्यंत उत्कृष्ठ उपक्रम आहे. निकोप व निरोगी समाजव्यवस्थेसाठी अशा स्पर्धेची आवश्यकता असते असे मत राज्याचे पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मांडले आहे.

Post a Comment

1 Comments

  1. JackpotCity Casino New Jersey - Mapyro
    JackpotCity Casino New Jersey. Mapyro. Find addresses, see 전라남도 출장안마 photos 충청남도 출장마사지 and see activity. It's 나주 출장샵 fun to be in and 경산 출장안마 out of this 대구광역 출장마사지 world.

    ReplyDelete