ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ.रोहित पवार यांच्या विधानाचा निषेध

उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ.रोहित पवार यांच्या विधानाचा निषेध


उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानाचा उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

आमदार रोहित पवार यांनी टीका करताना मर्यादा ओलांडली असून, अशा प्रकारची विधाने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाहीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र टीका करताना सन्मान आणि सभ्यतेची मर्यादा पाळणे आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मातृशक्तीचे योगदान अनन्यसाधारण राहिले आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास घडविला आहे. याच महान परंपरेचा वारसा पुढे नेत सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे नेतृत्वही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आपला ठसा उमटवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या विधानाच्या निषेधार्थ उदगीर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येवुन आमदार रोहित पवार यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर पक्षाचा ठाम विश्वास असून, महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी जि.प गटनेते, दिलीप मटके, जि.प सदस्य डॉ. दिपक सोमवंशी , तालुकाअध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियॉं, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, उपनगराध्यक्षा शितल शिंदे,प्रा. श्याम डावळे,माजी उपसभापती बाळासाहेब मरल्लापल्ले,उपसभापती विक्की भोसले, प्रकाश राठोड, प्रकाश बिरादार, नगरसेवक अनिल मूदाळे, राजकुमार भालेराव,नरसिंग शिंदे, राजकुमार पाटील, ईमरोज हाशमी, व्यंकट बोईनवाड, कल्याण कपाळे, गिरीश उप्परबावडे, अमर सुर्यवंशी,शेख जफर, धनाजी मुळे, शेख फैय्याज, शफी हाशमी, अरविंद गिलचे, सुदर्शन पाटील, अभिजित साकोळकर, महेश बिरादार, अबरार पठाण,
बालाजी देमगुंडे, प्रमोद काळोजी, प्रमोद पाटील, महिला शहराध्यक्षा मधुमती कनशट्टे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, सिमा नेत्रगावे, अविनाश गायकवाड, आजम पटेल, प्रशांत राठोड, अकरम जहागीरदार, राजकुमार गंडारे, सतिश कांबळे, शेख खाजा, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

***************

Post a Comment

Previous Post Next Post