GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोणी ग्रामपंचायत विमा ग्राम पुरस्काराने सन्मानित

लोणी ग्रामपंचायत विमा ग्राम पुरस्काराने सन्मानित
उदगीर-    भारतीय जीवन विमा निगम द्वारा घोषित सन 2020-2021 विमा ग्राम पुरस्कारने उदगीर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत ला सन्मानित करण्यात आले.
           सन 2020-2021 या वर्षा मध्ये भारतीय जीवन विमा निगम मध्ये सर्वाधिक पॉलिसी खरेदी करणारे लोणी गाव आहे. एका वर्षात 100 पेक्षा जास्त पॉलिसी खरेदी करून लोणी गावाने हा बहुमान पटकावला आहे. भारतीय जीवन विमा निगम द्वारा घोषित विमा ग्राम पुरस्कार म्हणून 75000/- रू चेक ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात सरपंच व उपसरपंच यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. व पारितोषिक म्हणून दिलेली रक्कम गावातील आवश्यक विकासकामांसाठी वापर करावा असे पत्र लोणी ग्रामपंचायत कार्यालयाकडून घेण्यात आले.
          यावेळी LIC शाखा अधिकारी उदगीर आनंद जोशी, उपशाखा अधिकारी सुमित पानतावणे , सरपंच सौ. उषा यमुनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ बिरादार, घोळवे सर, शामसुंदर सर, विमा प्रतिनिधी संतोष मुंडे, शुभम कावर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद पटवारी, ज्ञानेश्वर गायकवाड, जावेद शेख, इक्बाल शेख, पांडुरंग केंद्रे, यमुनाजी भुजबळे, शिवाजी चोले, रोहिदास मदनुरे, सुभाष कावर, शिवाजी शेटकार, मधुकर मदनुरे, परशुराम केंद्रे, पांडुरंग फड व इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments