GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीट मार्शल (चार्ली) वेगाने काम करणार - उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीट मार्शल (चार्ली) वेगाने काम करणार - उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन

उदगीर : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शहरात २४ तास ४ कर्मचारी गस्त घालतील यामुळे एखाद्याला तात्काळ मदत होणार असुन ११२ नंबरवर फोन केल्यास कर्मचारी २४ तास उपलब्ध होतील यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीट मार्शल (चार्ली) वेगाने काम करणार असल्याचे मत  उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी व्यक्त केले.
बीट मार्शल (चार्ली) या पथकाचा हिरवा झेंडा दाखवून उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
येथील उप विभागीय पोलिस अधिकारी,उपविभाग- उदगीर अंतर्गत पोलीस ठाणे उदगीर शहर व उदगीर ग्रामीण हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांच्या मदतीच्या दृष्टिने तसेच  एखादा गुन्हा घडल्यास त्यास तात्काळ/ जलद प्रतिसाद देण्याकरिता निखिल पिंगळे ,पोलीस अधीक्षक लातूर, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे संकल्पनेतून बीट मार्शल (चार्ली ) या उपक्रमाची सुरुवात काल दि.१ फेब्रुवारी २०२२ रोजी १२-००  उदगीर शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना बेन यांनी आमचे चार पोलीस कर्मचारी २४ तास ग्रस्त घालतील. यामुळे गरजुंना तात्काळ मदत घेण्यासाठी
११२ या हेल्पलाईनला फोन करुन पोलीस मदत घेता येणार असून या चार्ली साठी
दिवसा ४ व रात्री ४ असे २ शिफ्टमध्ये कर्मचारी असणार आहेत.
यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस. गायकवाड, पो.उपनिरीक्षक चेरले, पो.उप निरीक्षक एडके, गजानन पाटील, अविनाश फुलारी,पोलीस कर्मचारी राहुल गायकवाड, तुळशीराम बरुरे, रुपेश कज्जेवाड, श्री पाटील, टारपे, बबन चव्हाण, बुकटे आदीसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments