उदगीर येथे भव्यदिव्य असे बौध्दविहार उभारणार
गुलबर्गाच्या बौध्दविहाराची प्रतिकृती मतदार संघात उभारण्यात येणार - राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर : येथे भव्यदिव्य असे बौध्दविहार उभारण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा या ठिकाणी ज्याप्रमाणे भव्यदिव्य व प्रशस्त असे बौध्दविहार उभारण्यात आले आहे. त्याचीच प्रतिकृती उदगीर येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने ०६ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. पुढील ०६ महिन्यात हे बौध्दविहार उभा करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
ते बौद्ध विहाराच्या भुमीपुजनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बराजेश्वर निटुरे, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, रिपाइंचे नेते देविदास कांबळे, , गजानन सातळकर, राजकुमार भालेराव, जितेंद्र शिंदे, दयानंद शिंदे, बाबासाहेब सुर्यवंशी, शक्ती बलांडे, बहुजन विकास अभियानचे संजयकुमार, शशिकांत बनसोडे, सिध्दार्थ सुर्यवंशी, उमाकांत बनसोडे, सागर सोनकांबळे,अविनाश गायकवाड , सुधीर घोरपडे, सतिश कांबळे, आदी सह समाजबांधव उपस्थित होते.
उदगीर शहराचा पायाभुत विकास होत असताना सांस्कृतिक विकास होत आहे. मागील दोन वर्षात उदगीर शहरातील लिंगायत भवन, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, यलम समाजासाठीचे भवन, शादीखाना अशा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी/ नागरिकांसाठी उभा करण्यात आले आहे. या सोबत आज बौध्द समाजासाठी प्रशस्त बौध्दविहार उभा करण्यात येणार आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील बौध्दविहाराची प्रतिकृती उदगीर शहरात उभी करण्यात येणार आहे. आजपर्यंत ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापुढे ही आणखी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर बौध्दविहार मराठवाडयातील एक सुंदर व प्रशस्त असे विहार असणार आहे. हे विहार उदगीरच्या सौंदर्यात आणखी भर टाकेल विहाराचे काम वेळेत आणि दर्जेदार करण्यात यावे असे निर्देश यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
0 Comments