GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संवेदना फाऊंडेशनच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर


संवेदना फाऊंडेशनच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर

उदगीर : तालुक्यातील लोहारा गावचे सुपुत्र व शिलवासा येथे कार्यरत असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक हरेश्वर स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मभुमीत संवेदना फाऊंडेशनच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला लोहारा येथे करण्यात आले होते.
गेल्या 9 वर्षापासून लोहारा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, मोफत सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक्रमाचे आयोजन करुन आय पी एस हरेश्वर स्वामी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
यावेळी भागिरथीबाई स्वामी, स्नेहा स्वामी,  उपसरपंच शंकर भातमोडे, माजी पं.स. सदस्य बबन धनबा, पोलीस पाटील दिलीप पाटील, मु.अ. बोईनवाड, रामभाऊ सोनटक्के, तात्याराव बिरादार, चंद्रकांत भातमोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदान शिबीरात बहुतांश रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी संवेदना फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांचा व डाॅक्टरांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वरोग निदान शिबीरात सुमंगल हाॅस्पिटलचे सुप्रसिद्ध डाॅ.श्रीकांत मुंडे, डाॅ.संगमेश्वर सिध्देश्वरे, डाॅ.दत्ता पाटील, डाॅ.विठ्ठल चवळे या तज्ञ डाॅक्टरांनी रुग्णाची तपासणी केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संवेदना फाऊंडेशनचे महेश्वर स्वामी, शिवकुमार खरोबे, मनोज बिरादार, प्रशांत सोनटक्के, राजकुमार साकोळे, महेश्वर मठचे, अजय पाटील, धिरज पाटील, राम फुलारी, मंगेश राजवाडे, आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments