आई - वडिलांचे संस्कार जपत सामाजिक बांधिलकी जपणारी समाजसेविका : डाॅ.भाग्यश्री विरभद्र घाळे
उदगीर शहरात सामाजिक कार्यातुन आपले वेगळे स्थान निर्माण करुन आई - वडिलांच्या संस्काराची जाण ठेवत समाजसेवेचा वसा हाती घेवुन डाॅक्टरची पदवी घेवुन सर्वसामान्यांची सेवा करणारी महिला म्हणून आज भाग्यश्री विरभद्र घाळे ह्या पुढे येत आहेत. त्याच सामाजिक कार्याला राजकारणाची जोड देत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डाॅ.भाग्यश्री घाळे यांच्या पहिल्या वर्षीपुर्तीनिमित्त हा त्यांच्या कार्याचा विशेष लेख.
देशाचे नेते, शेतकरी पुत्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या जन्मदिनी व उदगीर विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार विकासाभिमुख नेतृत्व राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या सुचनेनुसार व डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या संमतीने, लातूर डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. राजेसाहेब चव्हाण यांनी दि. 20 डिसेंबर 2020 रोजी उदगीर येथील सामाजिक क्षेत्रात प्रमाणिक काम करणाऱ्या डाॅ.भाग्यश्री घाळे यांची डाॅक्टर सेलच्या उदगीर शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.
तो म्हणजे सगळीकडेच कोरोनाचा हाहाकार होता. त्यातच डाॅ. भाग्यश्री घाळे यांची नियुक्ती हे एक आव्हान त्यांच्यासाठी आव्हान होते. मात्र या संधीचा फायदा डाॅ.घाळे यांनी सामाजिक सेवेसाठी केला.
पेशाने डॉक्टर असल्याने डाॅ.घाळे यांना त्यांच्या भागातील जनतेच्या अरोग्याची काळजी घेणं हे आपल कर्तव्य समजून त्या काम करत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत त्या पोहचत पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मार्गदर्शक बसवराज पाटील नागराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या शतायु या रूग्णालयात लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढविणारे आयुर्वेदातील योग सुवर्ण बिंन्दुप्राशन् याचे मोफत शिबिर आयोजीत करुन मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली. हा त्यांचा पहिला उपक्रम होता. त्याच काळात कोरोना सोबतच चिकनगुन्याची साथ होती. त्यावेळी समाजमाध्यमे वर्तमानपत्र याद्वारे या रोगांबद्दल नागरिकांना माहिती पोहोचवायचा प्रयत्न केला.
कोरोनामुळे मार्च महिन्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी व जनजागृती व्हावी या उद्देशाने डॉक्टर्स सेलच्या वतीने तहसील कार्यालय ते शाहु चौक परिसरातील भाजीविक्रेत्यांना मास्क सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.
कोविड -१९ कोरोनापासून बचावासाठी करण्यासाठी मास्क चा वापर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन किती आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली. शासकिय कोविड सेंटर तोंडारपाटी येथेही रूग्णसेवा करीत असताना जमेल त्या परीने कोविड रुग्णांची मदत केली.
महिला दिनानिमित्त्य महिलांसाठी मोफत रोगनिदान शिबीर, त्यासोबतच फेसबुकच्या व सोशलमिडीयाद्वारे महिलांच्या आरोग्य समस्या बद्दल व्याख्याने दिली व अनेक अनेक स्त्रीयांशी त्यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य व संबंधी समस्यांविषयी संवाद साधला व त्यांच्या शंका समस्यांचे समाधान केले.
याच काळात मत्स्य विज्ञान पशुवैद्यकीय महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत कोविड काळात काम करत असताना हाॅय्जिन् अँन्ड सैनिटायजेशन या विषयांवर मान्यवर व नागरिकांशी संवाद साधला.
लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली तेव्हा लसीकरणाबद्दल लोकांच्या मनात भीती व संभ्रमाचे वातावरण होते. लोकांच्या मनातील भिती दूर व्हावी म्हणून त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले. जागतिक आरोग्यदिनी उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे लस घेणाऱ्या व्यक्तिंचे स्वागत व सत्कार करून नागरीकांचे मनोबल वाढविण्यात आले.
डॉ. शंकरराव चव्हाण व्याख्यानमाला या सदरात महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या महिलावर्गाच्या प्रगतीसाठीचे योगदान व कायद्यातील तरतुदी या विषयी व्याख्यानाद्वारे महिलांशी संवाद साधून माहिती देवुन राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे दरम्यान प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांना कार्याचा अहवाल दिला.
डाॅ.भाग्यश्री घाळे यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना डाॅक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली असुन येत्या काळात सामाजिक काम करण्यासाठी त्या नेहमीच कटिबध्द असतात.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढवणा येथे भव्य रोगनिदान शिबीर ही घेतले. ज्यात उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालय मार्फत 350 रुग्णांची नेत्रतपासणी तर 39 जणांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. 900 रुग्णांची रक्त लघवी तपासणी, उच्चरक्तदाब मधुमेह, संधीवात, चिकनगुन्या, त्वचारोग, दमा, स्त्रिरोग, पोटाचे आजार यावर मोफत औषधोपचारही या शिबीरात करण्यात आले.
गणेशोत्सव काळातही शहरी भागात अशी शिबीरे राबवली गेली. नवरात्रोत्सवादरम्यान महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर जनजागृती व्हावी, किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याप्राप्ती सजगता वाढावी या हेतुने मुली व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी व अनेमिया उपचार शिबीर राबवुन
ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये ताप, डेंग्यु, मलेरीया, टायफाईड या रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन उदगीर तालुक्यातील
डोंगरशेळकी, सोमनाथपूर तांडा, गुडसूर, एकुर्का या गावांमध्ये मोफत सुवर्ण बिंदुप्राशन शिबीर आयोजीत करुन यामध्ये पालकांशी संवाद साधून याबाबत माहिती दिली. अशा प्रकारे डाॅक्टर सेलच्या माध्यामातून राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलच्या तालुकाध्यक्षा डाॅ.भाग्यश्री घाळे यांनी आजपर्यंत पक्षाचे व समाज सेवेचे काम केले असुन आज त्यांच्या कारकीर्दीस एक वर्ष पूर्ण झाले असून येत्या काळात त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
श्री.सिध्दार्थ सुर्यवंशी
उदगीर
1 Comments
Best of luck and good job madam
ReplyDelete