GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कुमठा (खुर्द) येथे सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

कुमठा (खुर्द) येथे सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर 
 
५८ जणांनी केले रक्तदान, शेकडो लोकांनी घेतला शिबीराचा लाभ 

उदगीर : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे  प्रतिष्ठान कुमठा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १२ डिसेंबर रोजी उदगीर तालुक्यातील कुमठा (खुर्द) येथील जि.प. प्रशाला येथे सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून संघर्ष बाणा घेऊन आयुष्य वेचणारे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षपूर्ण कार्याला उजाळा दिला. तसेच कुमठा व परिसरातील शेकडो नागरिकांनी यावेळी आयोजित सर्वरोग निदान शिबीराचा लाभ घेतला. 
या शिबीरात बालरोगतज्ञ डॉ. बाळासाहेब पाटील, हृदय व छातीविकार तज्ञ डॉ. प्रशांत चोले, त्वचारोग तज्ञ डॉ. संतोष पांचाळ, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्राजक्ता गुरडे, रो. डॉ. सुलोचना येरोळकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. सचिन बांगे, मधुमेह तज्ञ डॉ. बालाजी बिरादार, डॉ. प्रशांत नवटक्के, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. विजय केंद्रे, डॉ. मनोहर सूर्यवंशी, जनरल फिजीशीयन डॉ. संजय सांडोळकर सह धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलचे ह्रदय व छातीचे विकार तज्ञ डॉ. संगमेश्वर दाचावार, दंतरोग व मुखरोग तज्ञ डॉ. सुप्रिया पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रश्मी चिद्रे, हर्निया व मूळव्याध तज्ञ डॉ. विष्णुकांत मुंडे, व नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेचे डॉ. बसवराज शेटकार तसेच उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. गणेश जोगदंड, बालाजी पांढरे, चिद्रेवार ऑप्टिकल्सचे गणेश चिद्रेवार, सचिन पवार, रामभाऊ सोनटक्के यांनी रुग्णांना यावेळी सेवा दिली. शिबीरस्थळी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच यावेळी रक्तदान करून आपल्या प्रिय नेत्यास आदरांजली वाहिली. उदगीर रोटरी क्लबचे मानद सदस्य तथा अंबरखाने ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, सुभाष देशपांडे, खंडेराव कुलकर्णी, विश्वनाथ केंद्रे, दामोदर केंद्रे गुरुजी शिवाजी व्यंकटराव केंद्रे, महाजन भुसारे, संभाजी फड यांची यावेळी  उपस्थिती होती. 
शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे सचिव रविंद्र हसरगुंडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, संतोष फुलारी, विशाल जैन, मंगला विश्वनाथे, डॉ. सुनीता लोहारे, विशाल तोंडचिरकर, विजयकुमार पारसेवार, गजानन चिद्रेवार, डॉ. सुधीर जाधव व दत्तू घुगे, सतीश केंद्रे, सोमनाथ कारभारी, दुर्गा केंद्रे, हरी रणक्षेत्रे, प्रवीण केंद्रे, नारायण राणे, बाळा घुगे, गणेश फड, राम कारभारी, केशव पाटील सह भागवत केंद्रे व मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments