राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ.जाकीर हुसेन चौकाचे अनावरण
उदगीर : येथील गेल्या 15 वर्षांपासून चर्चेत असलेल्या भारतरत्न डॉ.जाकीर हुसेन चौकाचे काल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसवराज पाटील नागराळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, सभापती शिवाजी मुळे, नगरसेवक पठाण मंजुरखाँ, माजी नगराध्यक्षा फैज़ मोहम्मदखाँ पठाण, सय्यद ताहेर हुसेन,जरगर शमशोद्दीन,भालेराव राजकुमार,शेख फय्याज, इमरोज हाशमी, इब्राहिम पटेल, सय्यद जानीभाई, अजिम दायमी, सनाउल्ला खान, शफी हाशमी, समद शेख, मुकेश भालेराव यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे , शहरचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments