उदगीरच्या ऐतिहासिक किल्ला दुरुस्तीसाठी 4 कोटी 88 लक्ष रु निधी मंजूर
पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश
उदगीर : येथील नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या उदागिर बाबांच्या ऐतिहासिक
किल्ल्याच्या दुरुस्ती व जतन करण्यासाठी 4 कोटी 88 लक्ष रुपयाचा निधी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे.
उदगीरच्या या ऐतिहासिक भोईकोट किल्ल्यासाठी यापूर्वी माजी आ.स्व.चंद्रशेखर भोसले हे आमदार असताना निधी आला होता. त्यानंतर ना. संजय बनसोडे यांनी हा निधी मंजूर करून घेतला आहे यामुळे उदगीर तालुक्याचा विकासात भर पडणार आहे.
उदगीरकरांना कायम उत्कंठा असते की उदगीरकरांसाठी आणखी काय मोठी घोषणा या भागाचे आमदार आणि राज्यमंत्री संजय बनसोडे करणार मात्र उदगीर मतदार संघात जवळपास गेल्या २ वर्षाच्या काळात विकासाची गंगा वाहत असुन यामध्ये विविध विकास योजना राबवण्यावर त्यांचा भर असतो, अनेक विकास कामे प्रगती पथावर असुन एक विकासाची दृष्टी असलेले व सर्वसामान्यांचे नेते म्हणून ना.संजय बनसोडे यांचे मतदारांतुन कौतुक होत आहेत.
ना.बनसोडे हे निवडणून आल्यापासुन गेल्या वर्षभरात प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, एम. आय.डी. सी, उदगीर शहरातील दोन उड्डाणपूल, तिरु नदीवरील बॅरेजेस, नाट्यगृह, शादीखाना, बौद्धविहार, लिंगायत भवन, अण्णाभाऊ साठे स्मारक, उदगीर ते तोंडार रस्ता रुंदीकरण यासह अनेक विविध विकास कामे ना.संजय बनसोडे यांनी मंजूर केली आहेत.
0 Comments