विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
कै.बालाजी मोरे युवा प्रतिष्ठान व
संदीप कोयले मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम
उदगीर : तालुक्यातील शेल्हाळ येथील भुमिपुत्र सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष संदीप कोयले यांनी सामाजिक बांधिलकी जपून ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पोलीस कर्मचारी, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेले सैनिक यांचा व त्यांच्या कुटुंबांचा गुणगौरव व सत्कार समारंभ दि.१५ सप्टेंबर रोजी शेल्हाळ येथे आयोजित करुन त्यांचा सत्कार केला.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा
या उक्तीप्रमाणे संदीप कोयले हे काम करत असतात निडेबन ग्रामपंचायतीत त्यांच्या आई सदस्य असुन निडेबन येथेही विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, मोफत रक्त तपासणी, गरजुंसाठी मोफत रुग्णवाहिका, दुष्काळात शेकडो कुटुंबांना टँकरव्दारे मोफत
पाणी पुरवठा आणि आता कोरोनाच्या काळात दुर्लक्षित असलेले पण ज्यांनी २४ तास काम केले असे सर्व घटक म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पोलीस कर्मचारी, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेले सैनिक यांचा सत्कार संदीप कोयले यांच्या पुढाकारातुन त्यांनी केला. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेल्हाळच्या
सरपंच विमलबाई चिखले ह्या होत्या. तर आयोजक कै.बालाजी मोरे युवा प्रतिष्ठानचे
अध्यक्ष बळीराम जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष संदीप अशोकराव कोयले यांनी केले होते.
या कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून
देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान
राहुल लक्ष्मण मोरे, राहुल पंढरीनाथ कोयले, यादव चंद्रकांत जाधव, गणेश माधव तेलंगे, बंकट उत्तम जाधव, दिगंबर बाबुराव बिरादार ( BSF ), शरद त्र्यंबक चिखले तर
आशा सेविका वंदना राजकुमार मोरे, प्रतिभा बालाजी सोनवणे, अंगणवाडी शिक्षिका सुनीता आनंदा जाधव, मनिषा सचिन मोरे
ग्रामपंचायत कर्मचारी भिमराव तुकाराम मुळे ( पाणीपुरवठा ), कमळबाई कांबळे ( स्वच्छता ) आदींचा सत्कार सहकुटुंब करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भास्कर इंगळे यांनी केले तर. आभार होळकर बिरुदेव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आबा मोरे, राम मोरे, दत्ता पाटील, हेमंत मोरे, नागेश मोरे, विवेकानंद मोरे, भरत कोयले, शंकर मोरे, पुंडलिक कोयले , विकी सूर्यवंशी, कैलाश मोरे, नागेश कोयले , शिवाजी कोयले, लक्ष्मण जाधव, महेश मोरे, महेश कोयले, आदी परिश्रम घेतले.
0 Comments