GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्या सोबतच पर्यावरणाचे संवर्धन करणारी महाराष्ट्र शिक्षण संस्था ही आदर्श संस्था आहे : पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्या सोबतच पर्यावरणाचे संवर्धन करणारी महाराष्ट्र शिक्षण संस्था ही आदर्श संस्था आहे : पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे 

 उदगीर : विद्यार्थी घडविण्यासोबतच  पर्यावरण संवर्धन करणारी महाराष्ट्र शिक्षण संस्था ही आदर्श संस्था असून ग्रामीण व अनुसूचित जाती व   वि. ज. भ.ज  घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देवुन विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यासोबतच  पर्यावरण संवर्धन करणार्‍या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्य आदर्श असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले ते कृष्णमाता अनुसूचित जाती आश्रम शाळेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर  हे होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव कांडगीरे ,  उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, सभापती प्रा.शिवाजी मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटूरे , मल्लिकार्जून मानकरी, प्रा. प्रविण भोळे ,उदय मुंडकर ,विजयकुमार चवळे , गजानन भोपणीकर , मंजूरखाँ पठाण , फैजखाँ पठान ,राजकुमार भालेराव,  यांची उपस्थिती होती. 
पुढे बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी १९८२ पासून महाराष्ट्र शिक्षण संस्था त्यांच्या शाळातून ग्रामीण कष्टकऱ्यांच्या मुलांचे जीवन घडवण्याची काम करत आहे सर्व शाळातून व्यंकटराव कांडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ आर ओ फिल्टरचे पाणी, खेळासाठी  प्रशस्त मैदाने,  सर्वसोयीयुक्त  शाळेच्या व  वस्तीगृहाच्या इमारती यामुळे शाळांमधून व वसतिगृहातून राष्ट्राचे भविष्य घडत आहे असे गौरवोद्गार ना. बनसोडे यांनी काढले.  
यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार व्यंकटराव कांडगिरे , बळीराम कांडगिरे  यांनी केले .  यावेळी डाॅ. दत्ताञ्य पवार ,डाॅ. हरीदास,  डाॅ. शशिकांत देशपांडे , गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे ,शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी धमनसुरे  हे  उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कांडगीरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर नादरगे यांनी केले यावेळी शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments