GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कोरोना लसीकरण जनजागृती रथाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोना लसीकरण जनजागृती रथाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

उदगीर :  येथील नवजीवन ज्योती सेवाभावी संस्था उदगीर च्या वतीने कोरोना लसीकरण जनजागृती प्रचार फलकाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नुकतेच  करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, कार्याध्यक्ष गजानन साताळकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, नवनाथ गायकवाड, श्याम डावळे, पत्रकार सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रा. बिभीषण मद्देवाड, आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्याम सूर्यवंशी, संस्था सचिव संतोष सुर्यवंशी, नागनाथ सूर्यवंशी, बळीराम माने आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील काळात या संस्थेच्या माध्यामातून श्याम सुर्यवंशी यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असुन आता कोरोनाच्या महामारीत लसीकरणाविषयी जनजागृती करुन ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीसंदर्भातील गैरसमज दूर करत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments