GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात लग्न समारंभ-50 व अंत्यविधी-25 व्यक्तींच्या मर्यादेत करण्याचे आदेश जारी

जिल्ह्यात लग्न समारंभ-50 व अंत्यविधी-25 
व्यक्तींच्या मर्यादेत करण्याचे आदेश जारी

लातूर : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.त्याअन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित करण्यात आले आहे.
    दिनांक 6 जून 2021 नुसार लातूर जिल्हयाच्या निर्बधाचे स्तर-1 मध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे.सद्यस्थितीत जिल्हयात जरी कोविड-19 रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी लग्न समारंभास नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करणेसाठी लग्न समारंभ व अंत्यविधी कार्यक्रमात व्यक्तींची मर्यादा कमी करण्याची व याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती.
    जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 6 जून 2021 रोजीच्या आदेशातील मार्गदर्शक सुचनेतील लग्न समारंभ-100 व्यक्तींच्या मर्यादेत व अंत्यविधी-50 व्यक्तींच्या मर्यादेत दिलेल्या शिथिलतेत बदल करुन लग्न समारंभ-50 व्यक्तींच्या मर्यादेत व अंत्यविधी-25 व्यक्तींच्या मर्यादेत करण्याचे आदेश जारी केले आहे.
    तसेच दिनांक 6 जून 2021 मधील दिलेल्या मार्गदर्शक सूचना जशाच तशा पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. सर्व संबंधित प्रशासकीय विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या आदेशाचे तंतोतंत अंमलबजावणी करावी.
    या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

                                             

Post a Comment

0 Comments