GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पोस्ते पोदार उदगीरचे वैभव : तहसीलदार रामेश्वर गोरे पोस्ते पोदार लर्न स्कूल चा तिसरा वर्धापन दिन. 1000 विद्यार्थी संख्येचा टप्पा केला पूर्ण

पोस्ते पोदार उदगीरचे वैभव : तहसीलदार रामेश्वर गोरे

पोस्ते पोदार लर्न स्कूल चा तिसरा वर्धापन दिन. 1000 विद्यार्थी संख्येचा टप्पा केला पूर्ण

उदगीर : येथील अग्रगण्य असलेल्या पोस्ते पोदार लर्न स्कूल चा तिसरा वर्धापन दिन दि. 18 रोजी अतिशय उत्साहात पार पडला. पोस्ते पोदार हे उदगीरचे वैभव असल्याचे मत 
उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी व्यक्त केले.
   यावेळी व्यासपीठावर पोदार इंटरनेशनल स्कूल लातूर चे प्रिन्सिपल गिरीधर रेड्डी, बीआरसी क्लस्टर हेड बालाजी धमणसुरे, लातूर पोदार चे रामसाने,  उद्योजक धनाजी मुळे, शाळेच्या अध्यक्षा प्रियंका पोस्ते,सचिव सूरज पोस्ते, शाळेचे प्राचार्य सूर्यकांत चवळे, संस्था सदस्य शिवराज पाटील,जग्देवी पोस्ते, अँड लोया यांची उपस्थिती होती.

2018 साली उदगीरची दर्जेदार शिक्षणाची गरज ओळखून केवळ त्या स्वप्नांने स्थापन झालेल्या पोस्ते पोदार लर्न स्कूल ला 3 वर्ष पूर्ण झाले. तसेच दुग्ध शर्करा योग म्हणजे मागच्याच वर्षी सीबीएसई संलग्नता मिळालेल्या या शाळेने इतक्या कमी काळात 32 वर्ग तुकड्या आणि 52 कर्मचाऱ्यासह 1000 विद्यार्थी संख्येचा टप्पा ओलांडत एक नवा इतिहास उदगीर परिसरात निर्माण केला. त्याबद्दल केक कापुन आनंदो त्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पहिल्या वर्षीपासून शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव सूरज पोस्ते यांनी सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देत आतापर्यंत करत असलेला प्रवासबद्दल माहिती दिली. प्राचार्य सूर्यकांत चवळे यांनी शाळेने आजपर्यंत केलेले काम, त्यातील आव्हाने, आणि भविष्यतील उपक्रमाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात शिक्षकांनी देखील शाळेबद्दल असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेषराव बिरादार व अंजुम मुजावर यानी तर सूत्रसंचलन वनिता सुगंधी,मुबारक मुल्ला व मनोज काळे यानी केले.
प्रतिनिधिक स्वरूपात पालक व मान्यवर तसेच शाळेतील सर्व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments