उदयगिरीच्या डॉ. सुरेश लांडगे यांची अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे दुग्धशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेश लांडगे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या "पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र तंत्रज्ञान अभ्यास मंडळ" अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते उदयगिरी महाविद्यालयात मागील 24 वर्षापासून दुग्धशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांची तीन पुस्तके व 41 शोधनिबंध आजवर प्रकाशित झाले आहेत. त्याच्या या निवडीबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments