GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

एकुर्का रोड येथे कोरोना लसीकरण; ग्राम पंचायतीने केली जनजागृती

एकुर्का रोड येथे कोरोना लसीकरण 
कोरोना लसीचा डोस घेताना रामकिशन जाधव दिसत आहेत.

उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले . विशेष बाब म्हणजे वाढवणा (बु) ग्रामीण रुग्णालया अंतर्गत एकूण ५ उपकेंद्रामध्ये सर्वात जास्त लसीकरण एकुर्का रोड मध्ये  एकूण २०२ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला .यामध्ये १८-४४ या वयोगटातील १५० युवकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर ४५-६० वयोगटातील ३० नागरिकांनी डोस घेतला. ६०+ वयोगटातील २१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ होती अशी माहिती आरोग्यसेवक डॉ.गोने यांनी जनस्तंभ न्युजला
दिली . कोरोना काळात गावात जनजागृती करुन लसीकरण करण्यामध्ये एकुर्का ग्रामपंचायत यशस्वी झाल्याने त्यांचे सर्वत्र 
अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments