GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर धनंजय गुडसूरकर यांची निवड उदगीरला मिळाली पहिल्यांदाच संधी

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर धनंजय गुडसूरकर यांची निवड

उदगीरला मिळाली पहिल्यांदाच संधी

    उदगीर : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून उदगीर येथील साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांची निवड झाली आहे.गुडसूरकर यांच्या निवडीने राज्य शासनाच्या महत्वाच्या सांस्कृतिक समितीवर उदगीरला स्थान मिळाले आहे.
   साहित्य संस्कृतीच्या व सामाजिक क्षेत्रात गुडसूरकर यांचे मोठे योगदान असून त्यांनी या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.मागील पंचवीस वर्षापासून त्यांनी प्रबोधन साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ आपल्या सहका-यांच्या मदतीने गतिमान ठेवली आहे.या परिषदेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, विविध साहित्य उपक्रम राबविले असून उपेक्षित साहित्यिकांना व्यासपिठ मिळवून दिले आहे .मागील पंधरा वर्षापासून ते उदगीर नगरपरिषदेच्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे  सल्लागार सदस्य आहेत.मसापचे ते सदस्य असून  उदगीर येथे झालेल्या मसापच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते कार्यवाह राहिले आहेत.या परिसरातील सांस्कृतिक ,साहित्यिक चळवळीला बळ देणारा व त्यासाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या गुडसूरकर यांची या मंडळावर निवड झाल्याबद्दल  पर्यावरण राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी अभिनंदन  केले आहे.
 शासनाने पुनर्गठित केलेल्या या समितीत अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ . सदानंद मोरे यांची फेरनिवड केली असून 
सदस्य म्हणून डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर,  मोनिका मजेंद्रगडकर, भारत सासणे, प्रा.फ.मु.शिंदे,  डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, प्रा.एल.बी.पाटील,  पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील,  दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रविंद्र बेडकीहाळ,  प्रा. रंगनाथ पठारे,  उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ आणि डॉ. संतोष खेडलेकर यांची निवड केली आहे.गुडसूरकर यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments