गाव पातळीवर लसीकरण मोहिमेची यशस्वी वाटचाल - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे
उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे लसीकरण केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांची भेट
उदगीर : कोरोनाच्या लढ्यात लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.असे म्हणत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रानंतर आता गाव पातळीवर लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांचा व कर्मचाऱ्यांचा, आशा कार्यकर्तीचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे व बस्वराज पाटील कौळखेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
लसीकरण झाल्यावर कोरोना होण्याची शक्यता खूप कमी असते आणि जरी कोरोना झाला तरी त्याची तीव्रता खूप कमी असते व जीवितहानी होत नाही. नागरिकांमध्ये लसीकरणासाठी जागृती निर्माण झाली असून त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे असेही राहुल केंद्रे यावेळी म्हणाले .
यावेळी नळगीर गटाचे जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बबन मुदाळे, पिंपरीचे चेअरमन शिवशंकर पांडे, उपसरपंच प्रतिभा पांडे,
सिद्धेश्वर बिरादार, बालाजी बिरादार उपस्थित होते.
0 Comments