GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मराठवाड्यातील पहिल्या आर टी पी सी आर मोबाईल व्हॅन मुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार - राज्यमंत्री संजय बनसोडे

मराठवाड्यातील पहिल्या आर टी पी सी आर  मोबाईल व्हॅन मुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार - राज्यमंत्री संजय बनसोडे 


उदगीर : लाईफकेअर येथील  मराठवाड्यातील पहिल्या आर टी पी सी आर मोबाईल व्हॅन मुळेआता कोरोना संशयित रुग्णांना तातडीने आर टी पी सी आर चा रिपोर्ट मिळणार असल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार करता येणार आहेत. तातडीने उपचार सुरू झाले तर रुग्ण गंभीर होण्याची त्याला ऑक्सिजन ची गरज लागण्याची वेळ येत नाही . नागरिकांनी उगिच घाबरून अथवा मनात शंका ठेवून तपासणी करण्यात चालढकल करू नये , तपासणी वेळेवर झाली तर रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी राहून बरा होऊ शकतो त्याला रुग्णालयात दाखल होण्याची गरजच पडत नाही असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लाईफ केअर येथील फिरत्या आर टी पी सी आर तपासणी  व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले . 
      येथील लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सोमवारी आर टी पी सी आर मोबाईल व्हॅन  केंद्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते . 
आर टी पी सी आर तपासणी साठी लातूर जिल्ह्यातील एकमेव लॅब असल्याने रिपोर्ट मिळण्यासाठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत होती . या कालावधीत या व्यक्तीमुळे अनेकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो . आता उदगीर मध्येच अवघ्या काही तासात रिपोर्ट मिळणार असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितते साठी शंका येताच तपासणी करून घ्यावी असे आवाहन  लाईफ केअर च्या अध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी  प्रस्तविकात केले .कोरोना संशयितांची  जास्तीत जास्त तपासणी करता यावी या करिता  सिने अभिनेते अक्षयकुमार यांना विनंती केली असता त्यांनी ती त्वरित मान्य केली . माय लॅब ला यासाठी आवश्यक असे अत्याधुनिक उपकरण देऊन साई फाऊंडेशनच्या माध्यमातून लाईफकेअर साठी तातडीने व्हॅन पाठवून दिल्याने आता अवघ्या काही तासात रिपोर्ट मिळण्याची सोय झाली असल्याचे डॉ. अर्चनाताई पाटील यांनी  सांगितले .
 
   भारत सरकारच्या आय सी एम आर आणि एन आय व्ही द्वारा मान्यता प्राप्त माय लॅब संचलित फिरते आर टी पी सी आर साठी सिने अभिनेता अक्षय कुमार यांनी संपूर्ण अत्याधुनिक उपकरणे दिली आहेत तर माय लॅब ने मोबाईल व्हॅन दिली आहे . यामुळे आता रुग्णांना अवघ्या काही तासात आर टी पी सी आर चा रिपोर्ट मिळणार आहे . अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वरासह तातडीने आर टी पी सी आर तपासणीचा रिपोर्ट मिळणार असल्याने कोरोना  बाधित रुग्णाची संपर्क साखळी तोडण्यात  उपयोगी ठरणार आहे .
    कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवण्याची व्यवस्था करणारे रोटी कपडा बँक ,  विश्व हिंदू परिषद , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे शुभम सुपारे , विशाल स्वामी , जगदीश चिद्रेवार , महेश कानमंदे , शेख गोस , खुर्शीद आलम , संतोष कुलकर्णी , विनोद खिंडे , अनिल मुधोळकर आदी कार्यकर्त्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे ,जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे ,  बस्वराज पाटील नगराळकर , माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे , चंद्रकांत वैजापुरे , ज्योती राठोड , कल्याण पाटील , प्रकाश येरमे , विजय निटूरे , उदयसिंग ठाकूर मिलिंद घनपाठी , डॉ अयुब पठाण डॉ पूजा घंटी , केदार पाटील ,अमोल गायकवाड , रुद्राली पाटील , अदिती पाटील , ऋषिका पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते . रमेश आंबरखाने यांनी आभार मानले तर बशीर शेख यांनी सूत्रसंचालन केले .

अक्षयकुमार यांचा उदगीर कराना मैत्रीचा हात
उदगीर करांच्या आरोग्यासाठी सिनेअभिनेते अक्षय कुमार यांनी डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आर टी पी सी आर लॅब  बाबत उदगीरकाराची गरज सांगितली असता अक्षयकुमार यांनी त्वरित सर्व अत्याधुनिक उपकरणासह एक व्हॅन पाठवून मैत्रीचा हात पुढे केला .


Post a Comment

0 Comments