GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

निराधारांना "श्वास प्रतिष्ठान" चा आधार!

निराधारांना "श्वास प्रतिष्ठान" चा आधार!

माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

उदगीर- येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील दहावी २००५ बॅच चे विद्यार्थ्यांनी श्वास प्रतिष्ठान च्या माध्यमातून गरीब गरजू व निराधारांना अन्न धान्य चे किट देऊन आधार देत आहेत.
       करोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रशासनाने ताळेबंद जाहीर केला. यामुळे हातावर पोट असलेल्या गरजू व निराधारांना मदतीचा हात देण्यासाठी लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इ. दहावी २००५ ची बॅच चे विद्यार्थ्यांनी श्वास प्रतिष्ठान ची स्थापना केली व मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. श्वास प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील गवळी गल्ली,शेटकार गल्ली, ब्राह्मण गल्ली, सराफा लाईन, पारकट्टी गल्ली, होळी गल्ली, चिल्लरगे गल्ली इ. येथील गरजू व निराधारांना अन्न धान्य किट चे वाटप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी उपस्थित श्वास प्रतिष्ठान चे अध्यक्ष अजित राठोड, कोषाध्यक्ष गजानन नागठाणे, उपाध्यक्ष कपिल वायचळकर , सहसचिव स्वप्निल ममदापुरे, सदस्य अमित मुंडे, विनीत निटुरे, महेश पाटील, पवन मुंडे, स्वप्निल सुर्यवंशी, सुनील चव्हाण इ. होते.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय शेटकार, शहर उपाध्यक्ष बंटी आलमकेरे, महेश स्वामी, डॉ. रवी मुळे, शुभम हावा, राहुल शेटकार, संगमेश्वर काळा, अभिजित चौधरी, अमर विश्वनाथे, शुभम शेटकार, संगमेश्वर हावा, कृष्णा पारसेवार अदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments