GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कोव्हीड केंद्रास मदत म्हणून जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षा, सर्व सभापतीसह जि.प.सदस्य देणार एक महिन्याचे मानधन - स्थायी समितीतील ठराव

कोव्हीड केंद्रास मदत म्हणून जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षा, सर्व सभापतीसह जि.प.सदस्य देणार एक महिन्याचे मानधन - स्थायी समितीतील ठराव


   लातूर : लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कोव्हिड -19 संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत
अध्यक्ष राहुल केंद्रे यानी जिल्ह्यात कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेला इंधनाची कमतरता भासणार नाही यासाठी संबधित अधिका-यांनी  दक्ष रहावे असे निर्देश दिले. तसेत कोरोना नियंत्रणासाठी लस हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगत संपूर्ण जिल्ह्यासाठी 12000 लस उपलब्ध  झाल्याची माहिती दिली.
 लातूर जिल्हा परिषदेतील जे अधिकारी / कर्मचारी कोरोना संसर्गाने मृत झाले आहेत अशा सर्वांना स्थायी समितीच्या सभेत श्रदाजंली अर्पण करण्यात आली. तसेच भारतीय जनता पक्षाचे सचिव कै.नागनाथअण्णा निडवदे यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांनाही या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
कोव्हिड आपत्कालीन परिस्थितीत जि.प. अधिकारी व कर्मचा-यांनी मदतीचा हात पुढे केल्यानंतर आज जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समितीच्या सभापतीसह सर्व जि.प.सदस्यांनीही एक महिन्याचे मानधन कोव्हिड केंद्राला मदत म्हणून देण्याचा ठराव जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी स्थायी समिती सभेत मांडला या ठरावाला जेष्ठ जि.प.सदस्य धनंजय देशमुख यांनी अनुमोदन दिले.या स्थायी समितीच्या सभेला अध्यक्ष राहुल केंद्रे,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,  उपाध्यक्षा भारतबाई सोळंके,अति. मु. का. अ. संतोष जोशी, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, बांधकाम सभापती संगीताताई घुले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जि.प.सदस्य संतोष वाघमारे, पृथ्वीराज शिवशिवे, धनंजय देशमुख, विमलताई पाटील, आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments