GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सहकार्‍यांची काळजी घेणारा संस्था प्रमुख : सतिश उस्तुरे संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचार्‍यांचा विमा उतरवुन दिला आधार

सहकार्‍यांची काळजी घेणारा संस्था प्रमुख : सतिश उस्तुरे

संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचार्‍यांचा विमा उतरवुन दिला  आधार

    उदगीर : एकीकडे आज आपण पाहत आहोत की कोरोना महामारीमुळे खाजगी क्षेत्र अक्षरक्ष: उध्दवस्त झालेली असुन त्यांना कर्मचा-र्यांचा पगार देणे शक्य नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली जात आहे. खाजगी नोकरदारांना उपासमारीची वेळ आली असताना दुसरीकडे सतिश उस्तुरे सारखी माणसे आहेत जी खाजगी क्षेत्रात काम करत असताना आपल्या कर्मचा-र्यांना स्वत:च्या कुटुबांतील सदस्याप्रमाणे समजुन सध्याचे जीवन कोरोना सारख्या महामारीमुळे अविश्वासाचे असुरक्षित होत असून होवु नये पण कोरणामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीसोबत  दुर्दैवाने अघटित घडल्यास त्या कुटुंबाची मोठी वाताहत होत असते त्यामुळे आपल्या कुटुंबाप्रमाणे असलेल्या संस्थेतील कर्मचा-र्यांचा मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश रे. उस्तुरे यांनी सामाजिक जानिवा जपत संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचा विमा मोफत उतरवरला आहे. मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे मातृभूमी महाविद्यालय मातृभूमी नर्सिंग स्कूल व कस्तुराबाई नर्सिंग स्कूलच्या एकूण ३२ कर्मचारी विनानुदान तत्त्वावर कार्यरत आहेत. नोकरीच्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो मात्र कर्मचाऱ्यांचे विम्याकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश रे. उस्तुरे यांनी एकून ३२ कर्मचाऱ्यांचा विमा काढून सामाजिक जाणिवा जपले आहेत. यामुळे  एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या नोकऱ्या जात असतानाच सतीश उस्तुरे यांनी कर्मचाऱ्यांचा विमा उतरत त्यांना आधार देण्याचे काम केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे .
मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे हे सामाजिक जाणिवा प्रगल्भ असलेले व्यक्तिमत्व असून सामाजिक कार्यातून सतत दातृत्व दाखवत असतात. कायम विनाअनुदानित तत्त्वावरील शाळा महाविद्यालय, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत, व इतर कंपन्यांमध्ये अनेक कर्मचारी काम करतात. श्री. उस्तुरे यांचा आदर्श घेऊन त्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आणि त्यांनी कर्मच्याऱ्यांसाठी काढलेला विम समाजात प्रेरणादायी आहे.

Post a Comment

0 Comments