रंगकर्मीच्या वतीने प्रा.प्रदिप वीरकपाळे यांना सर्वोत्कृष्ट समाजकार्याचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान
उदगीर : रंगकर्मी साहित्य,कला,क्रीडा प्रतिष्ठान उदगीर द्वारा आयोजित पाचवा राष्ट्रीय लघुपट महोत्सव व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर , महामानवाची गौरव गाथा मालिकेतील भिमराव आंबेडकर भुमिका फेम , हमबने तुमबने मालिका फेम , टकाटक ,गोळा बेरीज फेम अभिनेते मा.संकेत कोरलेकर तसेच आनुमती , हायवे ,हलाल ,द सायलेन्स कोती चित्रपट व देव पावला, भेटी लागे जीवा ,लक्ष , मालिका फेम अभिनेत्री मा.शिवकांता सुतार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चंदन पाटील यांच्या शुभहस्ते उदगीर शहरातील नामांकित श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेस चे संचालक, उदगीर पी.टी.ए.चे सचिव प्रा.प्रदीप वीरकपाळे सर यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उदगीर व परिसरात आजपर्यंत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल 49 पुरस्कार मिळालेले आहेत आणि रंगकर्मी कला, साहित्य व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार देण्यात आला त्यांचा हा कारकिर्दीतील 50 वा पुरस्कार होता हे विशेष व कौतुकास्पद आहे.
प्रा.प्रदिप वीरकपाळे हे हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर्स व इंजिनिअर्स बनवण्याचे तर कार्य केलेच आहे पण त्याच बरोबर सहकारमहर्षी चंद्रकांत आण्णा वैजापुरे, सभापती मुन्ना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य मागील चार वर्षांपासून रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, मोफत सर्वरोगनिदन शिबीर, शालेय मुलांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करतात तर लॉकडाउनच्या काळात हजारो कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप, मास्क व शानेटायझरचे वाटप त्यांनी केले आहे व अद्यापही हे कार्य ते करत आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना रंगकर्मीच्या वतीने हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या या पन्नासव्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्राचे मंत्री मा.संजयभाऊ बनसोडे, विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत आण्णा वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.सिद्धेश्वर उर्फ मुन्ना, पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजीराव मुळे, नगराध्यक्ष मा.बस्वराज बागबंदे पाटील पी टी ए चे राज्य उपाध्यक्ष प्रा गोपाळकृष्ण घोडके बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सिद्धेश्वर पटणे, प्रा. रामचंद्र बिरादार, प्रा.सोमनाथ बिराजदार, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.पांडुरंग फड, प्रा.संतोष चौधरी, प्रा. संजय जामकर इत्यादी मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला आहे.
0 Comments