GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संयमित शब्दातली काळजाला भेदणारी वेदना म्हणजे 'अक्षरांची पालखी' धनंजय गुडसूरकर यांचे मत

संयमित शब्दातली काळजाला भेदणारी वेदना म्हणजे 'अक्षरांची पालखी' धनंजय गुडसूरकर यांचे मत


   पुणे : दुःख व्यक्त करण्यासाठी ते भोगावे लागतेच असे नाही.इतरांच्या वेदनेच्या  कल्पनेने व्यथित होऊन व्यक्त होणे संवेदना असते.संयमित शब्दांत वेदना काळजाला भिडविणारी कविता म्हणजे 'अक्षरांची पालखी' होय  असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते धनंजय गुडसूरकर यांनी केले.सविता कुरूंदवाडे यांच्या अक्षराची पालखी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुडसूरकर यांच्या हस्ते  झाले.अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी होते.मसापच्या कोषाध्यक्ष सौ.सुनीताराजे पवार,भाषाअभ्यासक खंडेराव कुलकर्णी , कवयित्री सविता कुरूंदवाडे व्यासपिठावर उपस्थित होते.
    अक्षरांची पालखी ही थांबणारी नसून स्वतःमधला कार्यकर्ता जागा ठेवणारी तरीही यामध्ये भाबडेपणा नाही.घुसमटणा-या स्रीची वेदना व्यक्त होताना तलवार होणारे कुरूंदवाडे यांचे शब्द महत्त्वाचे आहेत असे गुडसूरकर   पुढे बोलताना  म्हणाले.यावेळी बोलताना मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी प्रत्येकाच्या आत कविता असल्याचे सांगितले .खुप मोठा आशय कमी शब्दांत येणे ही कवितेची कसोटी असते.जे टोचतं ते व्यक्त होण्यासाठी कवी लिहीतो,प्रतिभा ही देण असली तरी अंतर्मनाचा शोध कवीला घेता आला पाहिजे असे मत पवार यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.भाषा अभ्यासक खंडेराव कुलकर्णी यांनी सर्व कसोट्या पूर्ण करणारी व उत्कट भावनांचा अविष्कार या काव्यसंग्रहात असल्याचे गौरवोद्गार काढले.मन:पटलावर कोरलेल्या वेगवेगळ्या अर्थछटा मांडणारी कुरुंदवाडे यांची कवित श्रेष्ठच ठरते असे कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांनी हा काव्यप्रवास म्हणजे अस्तित्वाची शोधयात्रा असल्याचे सांगितले .रसिकांच्या वतीने दिलीप लिमये,दीपक बलसूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कवयित्री सविता कुरूंदवाडे यांनी प्रास्तविक केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी पाहुण्यांचा परिचय सुत्रसंचालन ज्योती पाटील, व नेहा कुलकर्णी  यांनी तर आश्विनी रानडे यांनी आभार  मानले. आमिती कोरे ,प्रज्ञा वाईकर अपर्णा कुलकर्णी  , सुभाष कुरूंदवाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments