सुंदर माझे कार्यालय उपक्रमा अतंर्गत
लातूर जिल्हा परिषदेने राबविले स्वच्छता अभियान
लातूर : जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयामध्ये सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम दि.28 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अभियान मोहीम स्वरूपात राबविण्यात येत आहे.
सुदंर माझे कार्यालय या उपक्रमा अंतर्गत पहिल्या टप्याची सुरूवात म्हणून दि.06 जानेवारी 2021 रोजी लातूर जिल्हा परिषद इमारतीच्या बाहेरील परिसर व बागेच्या परिसराची स्वच्छता करून या सुंदर माझे कार्यालय या अभियानाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यानी केले.
यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, आरोग्य अधिकारी परगे, कार्यकारी अभियंता शेलार सर्व विभाग प्रमुखासह सामान्य प्रशासन विभागाचे मसलगे व्ही.व्ही, रामकृष्ण फड तसेच सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित राहून परिसर स्वच्छता केली ही स्वच्छता अभियान मेहिम दरमहा राबविण्यात येणार आहे.
0 Comments