तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात ११९१ उमेदवार
शेवटच्या दिवशी ३१८ जणांची माघार ; डांगेवाडी, क्षेत्रफळ या २ ग्रामपंचायती बिनविरोध
उदगीर : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी चालू झाली आहे. निवडणूकीच्या रिंगणात एकूण ११९१ उमेदवारांनी दंड थोपटले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ३१८ जणांनी माघार घेतली आहे. दरम्यान सोमवारी २ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. एकूण तालुक्यातील ७ सदस्य असलेल्या ६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.
तालुक्यातील ६१ गावच्या ग्रामपंचायतीतून एकूण १५२३ नामनिर्देशन अर्ज वैध झाले होते. तर अर्ज माघारी घेेेण्यासाठी दि. ४ जानेवारी ही अंतिम तारीख असली तरी पहिल्याच दिवशी शुक्रवारी १४ जणांनी माघार घेतली होती. यामुळे १५०९ उमेदवार राहिले होते. दरम्यान सोमवारी ३१८ जणांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्याने १५ जानेवारी रोजी होणा-या निवडणूकीच्या रिंगणात ११९१ उमेदवार दंड थोपटून उतरले आहेत. तर यापूर्वीच तालुक्यातील रूद्रवाडी, टाकळी, धडकनाळ व जकनाळ आदी ४ ग्रामपंचायती बिनविरोध तर शेवटच्या दिवशी डांगेवाडी, क्षेत्रफळ या २ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तसेच १८ गावातील २८ सदस्य बिनविरोध निघाले आहेत. तालुक्यातील आडोळवाडी, इस्मालपूर, रूद्रवाडी व कुमदाळ हेर येथे एक ही नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले नाही. तालुक्यातील ६१ ग्रामपंचायती पैकी ५५ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, दुसरे नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांनी दिली.
0 Comments