अटल अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात
पाईपलाईनसाठी उखडलेल्या रस्त्यावर सिमेंट क्राँक्रिट चे काम सुरू
उदगीर : शहरातील अटल अमृत योजना अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाइनचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू होते, या पाईप लाईनसाठी शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळातील जे रस्ते खोदले होते तेथे सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता करुन सुरुळीत करण्याचे काम आता संबंधित ठेकेदारामार्फत चालु आहे.
या कामाचा शुभारंभ दि.०३ जानेवारी रोजी
नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तेजस कॅन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत अटल अमृत योजना अंतर्गत लिंबोटीतुन पाणी पुरवठा करण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात असून मार्च - २०२१ अखेर उदगीर वासियांना या योजनेतून पाणी पुरवठा होणार असून, या योजनेतील पाईप लाईन साठी शहरातील ज्या रस्त्याचे खोदकाम केले होते त्या रस्त्याची दुरुस्ती व त्यावर सिमेंट क्राँक्रिटच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष बागबंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, अनिल मुदाळे, शमशोदिन जरगर, पप्पू गायकवाड, दत्ता पाटील, श्रीरंग कांबळे,शैख महेबूब, लाखन कांबळे अभियंता सुनील खटके, जिवन प्राधिकरण उप अभियंता नागरगोजे, तेजस कन्स्ट्रक्शन के तेजस कुलकर्णी, विजय भोपले, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
* उदगीरकरांच्या जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे पाणी हा होता आता अटल अमृत योजनेतुन मार्च अखेर उदगीरवासियांना लिबोंटी येथुन पाणी पुरवठा होणार असून ही योजना पुढील 50 वर्षाचे नियोजन करून केली आहे. यामुळे उदगिरकरांची पाण्याची अडचण दुर होणार आहे. या अटल अमृत योजनेचे काम तेजस कन्ट्रक्शनने केले आहे. उदगीरकरांना पूर्ण क्षमतेने येत्या काळात 24 तास पाणी पुरवठा होईल.
भारत राठोड
मुख्याधिकारी, न.प. उदगीर
* दरवर्षी उन्हाळ्यात उदगीर शहरातील रहिवाशांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. उदगीर शहराचा विस्तार पाहता आम्ही जे आज पाणीपुरवठा करतो तो कमी पडत होता मात्र आता लवकरच लिबोंटी येथुन पाणी पुरवठा होणार असून ही योजना पुढील जवळपास 50 वर्षाचे नियोजन करून केली असल्याने उदगीरकरांची तहाण आता भागणार आहे.
बस्वराज बागबंदे
नगराध्यक्ष, न.प., उदगीर
0 Comments