जिल्हयात दूर्धर आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करावी - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
दूर्धर आजार असलेल्या रुग्णास शासकीय योजनेचा लाभ दयावा
लातूर : जिल्हयात दूर्धर आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात तपासणी संख्या वाढवून जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, एच.आय.व्ही, टी.बी. आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, एम.आय.डी.सी.चे विभागीय अधिकारी महेश मेघमाळे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, जिल्हयात दूर्धर आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तपासणी संख्या वाढवून जनजागृती करावी तसेच दूर्धर आजार असणाऱ्या रुग्णास शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिल्या.आरोग्य विभागातील अधिकारी वर्गाने प्रत्येक तालुक्यात कॉर्नर बैठका घेऊन रुग्णाचे समोपदेशन करावे. जिल्हयात औषधोपचाराची कमतरता भासणार नाही याची संबंधितांनी दक्षता घेऊन समन्वयाने काम करावे अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
प्रारंभी कार्यक्रम अधिकारी बिपीन बोरडे यांनी प्रास्ताविकात जिल्हयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, एच.आय.व्ही, टी.बी. आढावा बैठकीची माहिती पीपीटी व्दारे सविस्तर विषद केली.या बैठकीस समितीतील सर्व सदस्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments