GS H

ब्रेकींग न्युज

सर्वोच्चा न्यायालयाच्या आदेशाने नगर परिषदेने अतिक्रमण हटवले...शहरातील सर्विस रस्ता होणार मोकळा...

सर्वोच्चा न्यायालयाच्या आदेशाने नगर परिषदेने अतिक्रमण हटवले...

शहरातील सर्विस रस्ता होणार मोकळा...


उदगीर : शहरातील नांदेड - बिदर या मुख्य रस्त्यावरील शिवाजी हाऊस सोसायटीतील चंद्रपाल परबत पाटील यांची दोन मजली इमारत अतिक्रमणात असल्याने सर्वोच्चा न्यायालयाच्या आदेशानुसार उदगीर नगर परिषदेने काल अतिक्रमण हटवले.
उदगीर शहारतील वाढती रहदारी पाहता शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त व्हावे म्हणून येथील नगर परिषदेने 'अतिक्रमण हटाव' मोहीम मुख्याधिकारी म्हणून 
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुशील खोडवेकर यांनी २०१२ मध्ये हाती घेतली होती. त्यावेळी उदगीर शहरातील बहुतांश अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत पूर्ण शहर पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात जात असुन याकडे नगर परिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का?

गेल्या ७ वर्षापासून चंद्रपाल पाटील विरूद्ध नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यात वाद चालु त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सदर इमारत अतिक्रमणात असल्याने पाडण्याचे आदेश दिल्याने उदगीर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात काल पाडण्यात आली.
शहरातील वाढत्या रहदारीस दररोजच अडथळा आणि वाद हे समिकरणच उदगीर येथील हातगाडेवाल्यांचे झाले असुन त्यांना शिस्त कोण लावणार असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शहरातील छ.शिवाजी चौक, शाहु चौक, कॅप्टन चौक, उमा चौक, नांदेड  - बिदर रोडवरील सर्व मुख्य ठिकाणच्या चौकात हातगाडेवाल्यांची दुचाकी व इतर वाहनधारकांना अरेरावी करुन मुख्य रस्त्यावरच ५ फुट अतिक्रमण करुन थांबत असल्याने उदगीर शहरासह परिसरातील सर्व नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने व येथील बाजारपेठ ही मोठी आहे. त्यामुळे येथे नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते मात्र वाढती लोकसंख्येच्या मानाने शहरातील रस्ते कमी पडत आहेत त्यातच येथील हातगाडेवाल्यांनी मुख्य रोडवरच अतिक्रमण केल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात असूनही ते फक्त बघ्यांची भुमिका घेत असल्याने आश्वर्य व्यत होत आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून उदगीर शहर व तालुक्याची ओळख आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला येथील वाहनधारक व नागरीक वैतागले असुन याकडे प्रशासन लक्ष देवून नागरिकांची होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्याची समस्या ऐरणीवर...
शहरात अनेक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल ् असल्याने या शहरात हजारो रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत असतात. मात्र शहरातील सततच्या वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकेसही रस्ता मिळत नाही. एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात जात असताना रुग्णाच्या जिवावरच ही वाहतूक कोंडी बेतत असल्याचे नागरिकातुन बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments