देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी उदगीरात समिश्र प्रतिसाद
महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली...
उदगीर : जगाचा आणि देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करुन शेतक-यांवर अन्याय केला असुन या कायद्याचा विरोध म्हणून संपूर्ण भारत बंदची हाक काल दि.८ डिसेंबर रोजी देण्यात आली होती. बंदमध्ये सर्वांनी देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांच्या बाजूने पाठिंबा द्यावा असे आवाहन आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उदगीर शहरात विविध पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या बंदला शहरात समिश्र प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनीही सहभाग नोंदवला.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असुन या देशाचा पोशिंदा शेतकरी आहे. आज बळीराजा संकटात असून त्यांच्यावरील जाचक कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा म्हणून संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आली होती. उदगीर शहरात सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने कडक भुमिका घेत बंदोबस्त ठेवला होता. या बंद मध्ये, शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एम आय एम, लोकभारती, आम आदमी पार्टी, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड,
आदीसह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे,कार्याध्यक्ष गजानन सताळकर, खरेदी विक्री संघाचे भरत चामले, शहराध्यक्ष समीर शेख, युवकचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, मागासवर्गीय विभागाचे तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, ज्ञानेश्वर पाटील, महिला शहराध्यक्षा सौ.दिपाली औटे, डाॅ.भाग्यश्री घाळे, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, संघशक्ती बलांडे, फेरोज देशमुख, प्रवीण भोळे, अरविंद कांबळे, धनाजी बनसोडे, नवनाथ गायकवाड, प्रदीप जोंधळे, शफी हाशमी, महेश बिरादार, आदी उपस्थित होते. तर तालुका काँग्रेसचे कमिटीवर अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, पं.स. चे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, शहराध्यक्ष मंजूर पठाण, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, अल्पसंख्याचे तालुकाध्यक्ष सय्यद जानीमियाँ, मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, रंगा राचुरे, नगरसेवक महेबुब शेख, अनिल मुदाळे, लोकभारतीचे अजित शिंदे, संजय पवार, मधुकर एकुर्केकर, माजी सरपंच सतिश पाटील माणकीकर, इब्राहिम देवर्जनकर, सुनिल सावळे, विजयकुमार चवळे, संतोष बिरादार, रामेश्वर बिरादार, कुणाल बागबंदे होते. शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगटोल, माजी सभापती ब्रम्हाजी केंद्रे, कैलास पाटील, अंकुश कोनाळे तर एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन, सनाउल्ला खान, समाजपार्टीचे जावेद बागवान आदी उपस्थित होते.
उदगीरात महाविकास आघाडीत बिघाडी?
काल जगाचा आणि देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करुन शेतक-यांवर अन्याय केला असुन या कायद्याचा विरोध म्हणून संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आली होती पण उदगीरात मात्र या बंदच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा हातात घेवुन आपल्याच पक्षाचे पदाधिकारी घेवुन बंदची हाक देत होते तर दुसरीकडे काँग्रेस पक्षासह शिवसेना, समाजवादी पार्टी, एम आय एम या पक्षातील पदाधिकारी एकत्र येवून दुस-या बाजूने बंदची हाक देत होते. यामुळे राज्यात सत्तेत असणारे तीन पक्ष हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना वेगवेगळे दिसल्याने काल दिवसभर उदगीर शहरात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा होती.
0 Comments