देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला बळ द्या : तालुकाध्यक्ष कल्याण पाटील
उदगीर : जगाचा आणि देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करुन शेतक-यांवर अन्याय केला असुन या कायद्याचा विरोध म्हणून संपूर्ण भारत बंदची हाक आज दि.८ डिसेंबर रोजी देण्यात आली असुन आपण सर्वांनी देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांच्या बाजूने पाठिंबा द्यावा असे आवाहन उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील यांनी केले आहे.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असुन या देशाचा पोशिंदा शेतकरी आहे. आज बळीराजा संकटात असून त्यांच्यावरील जाचक कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा म्हणून संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आली असुन या बंदमध्ये आपण सर्वांनी एकजुटीने सामील होवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments