GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द

जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय 
मतदार यादी प्रसिध्द
लातूर -      राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रील ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायती व जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम घोषीत केला आहे.
               या मतदार यादी कार्यक्रमानुसार लातूर जिल्हयातील 408 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकीकृत पध्दतीने तयार केलेला प्रभाग निहाय मतदार याद्या संबंधीत ग्रामपंचायत तलाठी सज्जा,मंडळ अधिकारी, पंचायत समिती व तहसिल कार्यालयातील सूचना फलकावर दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या आहेत.
          सदरील प्रारुप प्रभाग निहाय मतदार यादीवर मतदार /नागरीक यांना हरकती व सूचना सादर करावयाच्या असल्यास त्या संबंधीत तहसील कार्यालयामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2020 ते 7 डिसेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.30 या वेळेत सादर करता येतील असे उपजिल्हाधिकारी (सामान्य), लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments