उदगीर : केंद्रसरकारने मंजूर केलेले शेतकरी विधेयक २०२० रद्द करावे या मागणीसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी उदगीर येथील सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विधेयक २०२० हे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्ली येथे मागील कांही दिवसापासुन आंदोलन चालू आहे.
दिल्लीकडे जात असलेल्या शैतकर्यांवर पोलीसांनी लाठी चालवत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली येथील आंदोलनास पाठींबा देण्यासाठी उदगीरात सर्वपक्षिय आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकर्यांसाठी धोकादायक असलेले विधेयक रद्द करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, उदगीर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष गजानन सताळकर , माजी सभापती मधुकर एकूर्केकर, लोकभारतीचे प्रदेश सचिव अजित शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष
मंजूरखाँ पठाण, सामाजिक कार्यकर्ते धनाजी मुळे , नगरसेवक अनिल मुदाळे, माजी सरपंच सतीश पाटील माणकीकर, सुनील केंद्रे, अजीम दायमी ,राजेश्वर भाटे ,अमोल घुमाडे, श्रीनिवास एकुर्केकर , मंगेश आपटे ,सद्दाम बागवान , आदर्श पिंपरे रामजी पिंपरे , नागेश पटवारी, धम्मानंद कांबळे , धनंजय पवार, अविनाश गायकवाड ईश्वर समगे आदींची उपस्थिती होती.
0 Comments