एमएसबीटीई हिवाळी 2025 परीक्षेत राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीरचा उज्वल निकाल
विद्यार्थ्यांची गुणवत्तेची परंपरा कायम
उदगीर : गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीर येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी 2025 परीक्षेत घवघवीत यश संपादन करून संस्थेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
तंत्रनिकेतनच्या कॉम्प्युटर विभागातील तृतीय वर्षातील कु. माने वेदिका तुकाराम हिने 94.47% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. मोमीन जैद अजीम (94.24%) द्वितीय तर राठोड लक्ष्मी (93.29%) तृतीय क्रमांकावर राहिल्या. द्वितीय वर्षात गायकवाड प्रिया संतोष (86.35%) प्रथम, कलबुर्गे आशुतोष संतोष (84.24%) द्वितीय व शेख साहिल गौस (83.53%) तृतीय आले. प्रथम वर्षात जाधव ज्ञानेश्वरी दत्ता (89.88%) प्रथम, पांचाळ आर्यन अंकुश (88.24%) द्वितीय व बिराजदार प्रार्थना अंतेश्वर (85.65%) तृतीय क्रमांकावर राहिले.
सिव्हिल विभागात तृतीय वर्षातून सूर्यवंशी कृष्णा विजयकुमार (92.11%) प्रथम, वाघमारे सृष्टी बालाजी (83.33%) द्वितीय व कोंडामंगले एकनाथ विठ्ठल (86.56%) तृतीय आले. द्वितीय वर्षात तलिकोटे वैष्णवी विजय (84.59%) प्रथम, गायकवाड सुप्रिया संतोष (84.24%) द्वितीय व फावडे वृषाली हाणमंत (72.59%) तृतीय ठरल्या. प्रथम वर्षात मलीशे प्रणिता बालाजी (85.53%) प्रथम, कोरे तनवी रामेश्वर (83.88%) द्वितीय व समुद्रे आदर्श अशोक (78.82%) तृतीय आले.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षातून घोणशेट्टे अथर्व (75.77%) प्रथम, शेख सानिया (73.18%) द्वितीय व गुजर गणेश (72.24%) तृतीय आले. द्वितीय वर्षात पवार प्रियंका (75%) प्रथम, कोनाळे शितल (69.88%) द्वितीय व कटारे दिग्विजय (68.47%) तृतीय ठरले. प्रथम वर्षात गुंडरे सायली (83.53%) प्रथम, कुलकर्णी समृद्धी (81.29%) द्वितीय व मोमीन नेहा (80.35%) तृतीय आले.
मेकॅनिकल विभागात तृतीय वर्षातून खडके ओमकार हिरालाल (78.12%) प्रथम, सय्यद कलाम रजाक (78.12%) द्वितीय व सूर्यवंशी आनंद (73.65%) तृतीय आले. द्वितीय वर्षात शेख दस्तगीर जवळ (73.44%) प्रथम, तेलंग प्रसाद (68.56%) द्वितीय व शेख मुनीर (65.56%) तृतीय ठरले. प्रथम वर्षात एकघेर मनीष विजयकुमार (83.06%) प्रथम, मुंजेवार मोमीन दस्तगीर (80.47%) द्वितीय व सावजी गोविंद सुनील (79.06%) तृतीय आले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात तृतीय वर्षातून पाटील ऋतुजा संजय (83.06%) प्रथम, पाटील श्रद्धा (81.77%) द्वितीय व वाघमारे संकेत (81.53%) तृतीय आले. द्वितीय वर्षात धोंडगे राहुल सतीश (81.67%) प्रथम, चेरेकर वैष्णवी (81.56%) द्वितीय व राठोड निकिता (80.11%) तृतीय ठरल्या. प्रथम वर्षात पवार प्रसाद युवराज (87.65%) प्रथम, पाटील दिनेश बालाजी (84.82%) द्वितीय व बिरादार राजनंदनी मोहन (82.94%) तृतीय आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब राठोड, सचिव अमित राठोड, प्राचार्य पी. डी. जाधव, विभागप्रमुख के. जी. मानकरी, आर. आर. इंद्राळे, वाय. एन. शेख, पी. के. शेख, पी. ए. मारमवार, प्रथम वर्ष समन्वयक पठाण वाय. एम., टी. पी. ओ. सोलापूरे एस. बी., सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.


Post a Comment