राज्यमंत्री बनसोडे यांनी केली महामानवावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी ....
उदगीरच्या इतिहासात पहिल्यांदाच महामानवावर आकाशातुन झाली पुष्पवृष्टी
उदगीर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
महामानव विश्वरत्न, भारतरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, बांधकाम मंत्री संजय बनसोडे यांनी हेलिकॉप्टर मधून महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर आकाशातुन पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले.
उदगीरच्या इतिहासात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अशा प्रकारे अभिवादन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आकाशातुन पुष्पवृष्टी झाल्यानंतर ना.संजय बनसोडे यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर,सभापती तथा तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, न्यानेश्वर पाटील, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, अल्पसंख्य काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद जानीमियाँ, रा.काँ. शहराध्यक्ष समिर शेख, महिला शहराध्यक्षा दिपाली औटे, नवनाथ गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, मुकेश भालेराव, अतिक शेख, संघशक्ती बलांडे, धनाजी बनसोडे, राजीव वाघे, नामदेव भोसले, अविनाश गायकवाड, प्रवीण भोळे, सतिश कांबळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments