GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

बनावट फेरफार केल्याप्रकरणी चौघावर गुन्हा दाखल; उदगीर वाढतोय भुखंड घोटाळा तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप मजगे व तलाठी शिवानंद गुंडरेसह अन्य दोघांचा समावेश


बनावट फेरफार केल्याप्रकरणी चौघावर गुन्हा दाखल; उदगीर वाढतोय भुखंड घोटाळा

तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप मजगे व तलाठी शिवानंद गुंडरेसह अन्य दोघांचा समावेश

उदगीर : तालुका हा वेगवेगळ्या घटनाने लातुर जिल्ह्यात गाजत असतो. मग ते कारण कोणतेही असो यामध्ये अनेकदा जबाबदार अधिकारीच असल्याने उघडकीस आले आहे. अशीच एक घटना काल उदगीर शहरात घडली असुन बनावट कागपत्रे करुन मुळ वारसाच्या डोळ्यात धुळ फेकुन येथील तलाठी व सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी इतर साथीदाराच्या मदतीने बनावट फेरफार केलगयाप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी त्यांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, आरोपी प्रमोद अशोक कामन्ना, माणिक विठ्ठलराव फुलारी व गाव तलाठी शिवानंद माधवराव गुंडरे, मंडळाधिकारी दिलीप शंकरराव मजगे यांनी फिर्यादी व त्यांची आई संगुबाई यांना फसविण्याच्या हेतूने व त्यांची व उदगीर येथील कायदेशीर मिळकत जमीन गट क्रमांक २२९/१० क्षेत्रातील १ हेक्टर १० आर गिळकृत (हाडप) करण्याच्या व या जमिनीतून बेदखल करण्याच्या हेतूने संगणमत करुन महसुल विभागाचे निर्णय गट क्रमांक २२९/०८ क्षेत्र १ हेक्टर ११ आर बाबतचे असल्याचे माहित असताना २२९/१० क्षेत्रातील १ हेक्टर १० आर साठी वापरून खोटे व बनावट रेकॉर्ड तयार करुन दि.२२-११-२०१८ ते दि.२४-०१-२०१९ दरम्यान व त्यापूर्वी जमीन गट क्रमांक २२९/१० क्षेत्रातील १ हेक्टर १० आर बाबत बनावट व खोटा फेरफार क्रमांक २९१९ हा मयत बकुळाबाई त्र्यंबक कामन्ना ( आरोपी प्रमोद अशोक कामन्ना यांची आजी ) हिच्या नावे बेकायदेशीर मजकूर करुन संगुबाई संग्राम पात्रे हिच्या नावे कायदेशीर रित्या कोर्ट डिक्री आधारे मंजूर झालेला फेरफार क्रमांक १२१२ बेकायदेशीर रीतीने खोटे व बनावट कागदपत्रे बनवून रद्द केला आहे असल्याचे फिर्यादीने दिलेल्या जवाबात म्हटले आहे. विश्वनाथ संग्राम पात्रे वय ७० यांच्या फिर्यादीवरुन वरील ४ आरोपी विरूद्ध गुरन व कलम २३९/२०२०vकलम ४२०, ४६५,४६६, ४६७, ४६८, ४७१, १६७, ३४ प्रमाणे आरोपी प्रमोद अशोक कामन्ना, माणिक विठ्ठलराव फुलारी व गाव तलाठी शिवानंद माधवराव गुंडरे, मंडळाधिकारी दिलीप शंकरराव मजगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. नानासाहेब उबाळे हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments