आपल्या भागातील धार्मिक स्थळे विकसित करणार : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
श्री मलयाप्पा मंदिराचा कळशारोहण सोहळा
उदगीर : उदगीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करताना मतदार संघातील सर्व जाती - धर्मांना न्याय दिला. उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध गावातील सर्व धार्मिक स्थळांना निधी उपलब्ध करून देवून त्यांचा विकास केला. या पुढील काळातही श्री मलयाप्पा मंदिराला ये - जा करण्यासाठीचा रस्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
ते नांवदी ता.उदगीर येथील श्री मलयाप्पा मंदिराच्या कळशारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी लातूर जि.प.चे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके , ज्ञानोबा केंद्रे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, नावंदीचे सरपंच ब्रह्मजी केंद्रे, श्याम डावळे, सर्जेराव भांगे, डॉ.गंगाधर पारगे, संतोष परगे, सतीश केंद्रे, समीर परगे, विशाल कोतागडे,रामेश्वर पाटील, अमोल बिरादार, राजकुमार बिरादार, बालाजी मादळे, संजय फुले, विष्णु फुले, सत्यवान बिरादार, जगु परगे, विठ्ठल फुले, सुरेश केंद्रे, विश्वनाथ बिरादार, दिपक तोंडारे, युवराज कांडगिरे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
आपल्या सर्वांना धार्मिक वारसा आहे. दया आणि कृपा ही ईश्वराची देण आहे. 'भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे' आणि ही भक्ती आम्हाला गुरुंनी शिकवली म्हणूनच आज या परिसरात भक्तीचा सुगंध पसरला आहे. आपण सर्वजन ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होतो व ईश्वराचेच नामस्मरण करतो असे केल्याने आपल्या मनाला समाधान लाभुन ईश्वराच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळत असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
मतदार संघातील सर्व जनतेच्या सुखासाठी श्री मलयाप्पा मंदिरात आपण दर्शन घेवुन त्यांच्या चरणी साकडे घातले आहे.
आपण सर्व माझ्या माता भगिनी व माझ्या बांधवांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवून दुसऱ्यांदा मोठे मताधिक्य देवुन निवडून दिलात म्हणून मी 'जे जे नव ते ते उदगीरला हवं' या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या उदगीरचा विकास केला आहे असुन यापुढे ही विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत पोहचवणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीर सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******************************


Post a Comment