नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत
भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मुलाखातीस उपस्थित राहण्याचे आवाहन
उदगीर : माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने उदगीर शहरातील सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शनिवार दि.८ नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आमदार संजयजी बनसोडे संपर्क कार्यालय, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर जि.लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या मुलाखतीस शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणी अर्ज दि.६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी संपर्क कार्यालातुन प्रत्यक्ष घेवुन जावुन दि.८ नोव्हेंबर रोजी ईच्छुक उमेदवारांची मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा पक्षाचे निरीक्षक अॅड.व्यंकट बेद्रे , प्रदेश सरचिटणीस सुरेखा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे हे मुलाखत घेणार आहेत. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीस उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ यांनी केले आहे.
**********

0 Comments