GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकार धावले...

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकार धावले...


मदत फेरीतील 31 हजार 285 रुपयाची रक्कम उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे सुपूर्द



उदगीर :
महाराष्ट्रसह उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह गुरे , विहिरी, घरांचे मोठे नुकसान झाले. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सामाजिक जानिवेतून उदगीरातील संवेदनशिल पत्रकारांनी मदत फेरी काढुन जमा झालेली मदत 31 हजार 285 रुपये रोख व कपडे उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे दिले.
मदत फेरीची सुरुवात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेजवळ करण्यात आले.
यावेळी पत्रकार बिभीषण मद्देवाड, सुनील हावा, सिध्दार्थ सुर्यवंशी, सचिन शिवशेट्टे, हणमंत केंद्रे, विनायक चाकूरे,
निवृत्ती जवळे, नागनाथ गुट्टे ,रऊफ पठाण, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, विक्रम हालगीकर, रसूल पठाण, माधव रोडगे , जावेद शेख ,नासेर काझी, अशोक कांबळे , मंगेश सुर्यवंशी, अरुण उजेडकर , एस. पी. शिंदे, बाबासाहेब मादळे, श्रीधर सावळे ,लतीफ तोंडारे, मनोहार लोहारे,अरवींद पत्की, जावेद शेख, अरुण उजेडकर, बालाजी तेलंगे, अनिल जाधव
यांच्यासह मोठया प्रमाणावर उदगीर मधील पत्रकार उपस्थीत होते.
मदत फेरी नगर परिषद, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उद्योग भवन , पत्तेवार चौक मुक्कावार चौकातुन हनुमान कट्टा येथे समारोप करण्यात आला. येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी यावेळी शक्य तेवढी मदत केली.
**************************

Post a Comment

0 Comments