उदगीर : आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवर आपले प्रतिनिधित्व करून स्वतःचे व आपल्या भागाचे नाव करावे यासाठी उदगीर मतदारसंघातील खेळाडूंना बळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत माजी क्रीडामंत्री तथा उदगीर - जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील टाइम्स पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलना प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप पेन्सलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरच्या नूतन नगराध्यक्षा सौ स्वाती हुडे, उद्योजक सतीश बेद्रे, संस्थेचे सचिव विजयकुमार कप्पिकेरे, कोषाध्यक्ष सौ. मंगल
कप्पिकेरे, मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार , प्राचार्य अभिजीत नळगिरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, नगरसेवक राजकुमार हुडगे, निकिता अंबरखाने, अबरार पठाण, सुनिल केंद्रे, मुकेश भालेराव, पालक प्रतिनिधी कुणाल बागबंदे, संग्राम भिंगोले, जयश्री कवठाळे, डाॅ. ज्ञानोबा मुंडे, संदीप हुडे, जगदीश बाहेती, रोहित कप्पीकेरे, गौरी जगताप, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, १९९६ पासुन संस्थेची स्थापणा होवून आजपर्यंतच्या वाटचीलीचा आढावा सांगितला. या संस्थेचे विद्यार्थी देशभरात विविध पदावर कार्यरत असुन देशसेवेसाठी योगदान देत आहेत तर अनेक विद्यार्थी हे विविध क्रीडा प्रकारात राज्यपातळीवर आपला नावलौकिक वाढवला आहे. इतरही विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात उत्तम खेळाडु घडावेत म्हणून उदगीर शहरात जिल्हा परिषदेच्या मैदानावर १५ कोटीचे क्रीडा संकुल उभारत आहे त्याचबरोबर सिंगापूरच्या धर्तीवर उदगीर शहरामध्ये ६ कोटीचे उद्यान विकसित करत आहे. याचाही फायदा या भागातील नागरीकांना होणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
*********************



Post a Comment